‘एक मुकदमा कर दो… जवाहरलाल नेहरू हाजिर हों! आरजेडी खासदार मनोज झा यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

‘एक मुकदमा कर दो… जवाहरलाल नेहरू हाजिर हों! आरजेडी खासदार मनोज झा यांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये भाग घेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबाबत केलेल्या दाव्यांचे खंडन करावे अशी मागणीही केली. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेत सरकारला कोंडीत पकडले.

‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार धरले. याचाच उल्लेख करत मनोज झा यांनी मोदी सरकारला जवाहरलाल नेहरू यांच्या एक खटलाच दाखल करा असे म्हणत उपरोधिक टीका केली. तसेच नेहरू इतक्या वर्षानंतरही तुम्हाला आठवत असतील तर त्यांच्यात काहीतरी नक्कीच खास असणार, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मला कॉपी करू दे, अन्यथा हातपाय तोडून टाकीन; भाजपच्या माजी खासदाराने मित्राला दिली होती धमकी मला कॉपी करू दे, अन्यथा हातपाय तोडून टाकीन; भाजपच्या माजी खासदाराने मित्राला दिली होती धमकी
उत्तर प्रदेशातील कैसरंगज येथील भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंग यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील...
DGCAचे धक्कादायक ऑडिट, 8 एअरलाइन्समध्ये आढळल्या 263 त्रुटी
‘लोकसभा मे निपट लिया’ म्हणून राज्यसभेतून पळ काढला, संजय राऊत यांचा मोदी-शहांवर निशाणा
मोदींच्या जिवश्च, कंठश्च मित्राने हिंदुस्थानवर टॅरिफ लादल्यापासून भाजपची वाचा गेलीय, सरकारने शेपूट घातले – संजय राऊत
हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अंडी आहेत खूप महत्त्वाची, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेत F-35 लढाऊ विमान कोसळले; पॅराशूटने उडी मारल्याने पायलट थोडक्यात बचावला
भरमसाठ वीजबिलामुळे पलावातील रहिवाशी होरपळले! स्मार्ट मीटर्समुळे ग्राहकांना शाॅक