India Squad For England Tour – इंग्लंड दौऱ्यात गिल कर्णधार, तर उपकर्णधारपदीही नवा खेळाडू; हिंदुस्थानचा संपूर्ण संघ जाणून घ्या…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी युवा फलंदाज शुभमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत हा उपकर्णधार असेल.
काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही स्टार खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे या कसोटी मालिकेत कोणाला संधी मिळते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. यानंतर आता बीसीसीआयने ट्वीट करत इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा केली आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने 18 खेळाडूंची घोषणा केली आहे.
शुभमन गिल, कर्णधार
ऋषभ पंत- उपकर्णधार
यशस्वी जयस्वाल
करुण नायर
रवींद्र जाडेजा
वॉशिंग्टन सुंदर
शार्दुल ठाकूर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
आकाश दीप
कुलदीप यादव
के एल राहुल
साई सुदर्शन
अभिमन्यू ईश्वरन
ध्रुव जुरेल
प्रसिद्ध कृष्णा
अर्शदीप सिंग
नितीश कुमार रेड्डी
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series
A look at the squad for India Men’s Tour of England
#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
— BCCI (@BCCI) May 24, 2025
20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आता टीम इंडिया सज्ज झाली आहे. मात्र टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. तसेत मोहम्मद शमी, सरफराज खान यांसारख्या खेळाडूंची वर्णी लागू शकलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List