शिवसेनेकडून चांदिवलीत पाच दिवस नागरी सुविधा उपक्रम
On
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून व विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेश्राम’ फाऊंडेशनच्या सहकार्याने चांदिवली विधानसभा क्षेत्र शाखा क्र. 158 मध्ये पाच दिवसीय नागरी सुविदा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्मान वंदना कार्ड व नवीन मतदार नोंदणी अशा विविध सेवांचा विनामूल्य लाभ नागरिकांना घेता येणार आहे. या लोकोपयोगी उपक्रमाचा शुभारंभ विभाग क्रमांक 6 चे विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘मेश्राम’ फाऊंडेशनचे सचिन अहिरेकर, शिवसेना महिला विभाग संघटक मनीषा नलावडे, माजी नगरसेविका चित्रा सांगळे यांच्यासह शिवसेना चांदिवली विधानसभेचे सर्व पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 May 2025 10:06:17
देशातील अनेक राज्यात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहेत. त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा...
Comment List