योग्य पत्ता न दिल्याने संतापला, झेप्टो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
योग्य पत्ता न दिल्याने संतापलेल्या झेप्टो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विष्णुवर्धन असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
बंगळुरूमधील बसवेश्वरनगर येथील जजेस कॉलनी येथील रहिवासी शशांक यांच्या मेव्हणीने 21 मे रोजी झेप्टोवरून ऑनलाईन ऑर्डर केली होती. झेप्टो डिलिव्हरी एजंट विष्णुवर्धन हे ऑर्डर केलेले पार्सल घेऊन आला. मात्र ऑर्डर बुक करताना घरचा पत्ता योग्य न दिल्याने त्याने शशांक यांच्या मेव्हणीशी वाद घातला.
वाद वाढत गेल्याने शशांक यांनी दोघांमध्ये हस्तक्षेप केला. यानंतर विष्णुवर्धनने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. विष्णुवर्धन याने शशांकच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मारहाण केली. मारहाणीमुळे शशांकच्या डोक्यात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शशांकने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत झेप्टोला या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. दरम्यान, झेप्टोने घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List