Ratnagiri News – रत्नागिरीत अवैधरित्या राहणाऱ्या 13 बांगलादेशींवर कारवाई; मायदेशात केली रवानगी
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबेर 2024 रोजी मिळालेल्या माहितीनुसार पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, हिंदूस्थानमध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत होते. या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला असता 13 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली असून त्यांना मायदेशी पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी छापेमारीमध्ये पकडलेल्या 13 बांगलादेशींची नावे वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजु अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार आणि मोहम्मद लालतू मोंदल किताब अली अशी आहेत.
पोलिसांनी या सर्वांकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांच्याकडे हिंदूस्थानी असल्याबबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत त्यावरून हे सर्व हिंदूस्थानमध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून रहात असल्याबबत खात्री झाली. याच आधारे रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ति अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला व या गुन्ह्याचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी केला. तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या सर्व 13 दोषी बांगलादेशी आरोपींना प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित एजन्सि यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला व या सर्व बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आलेले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List