कोकणात रेड अलर्ट, दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा

कोकणात रेड अलर्ट, दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनपूर्व पावसाने कोकण किनारपट्टीला प्रचंड झोडपले आहे. पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून तिन्ही जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार आहे.

मान्सूनपूर्व पावसाने मागील पाच-सहा दिवसांपासून राज्यभर जोरदार थैमान घातले आहे. एकीकडे मान्सून पुढे वाटचाल करीत आहे. त्याआधी मान्सूनपूर्व पावसाने राज्यात शेतीची दाणादाण उडवून दिली आहे. अनेक भागांत ताशी 30 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच मुंबईजवळील रायगडच्या किनारपट्टी भागात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस मुक्कामी राहिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र बनत चालल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पुढील दोन दिवस तिन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. दोन दिवस अतिवृष्टी होणार असून या काळात वारे ताशी 40 ते 50 किमी वेगाने वाहणार आहेत. समुद्रालगतच्या भागांत या पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तसेच मच्छीमारांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक आदी भागांतही पावसाची जोरदार हजेरी कायम राहणार आहे. त्यात शेतीचे मोठे नुकसान होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अनेक भागांत वीज कोसळून मनुष्यहानी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात अनेक राज्यांवर मुसळधार पावसाचे सावट

महाराष्ट्राबरोबरच देशातील अनेक राज्यांना मान्सूनपूर्व पावसाने धडकी भरवली आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या गोवा, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, झारखंड, लक्षद्वीप, उत्तराखंड आदी ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अद्याप चक्रीवादळ तयार झालेले नाही!

उत्तर कर्नाटक-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होऊन कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या इतर भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही, असे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितले. दरम्यान, पुढील काही दिवसांत वातावरणीय आणि सागरी परिस्थितीनुसार कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

– वैभववाडीच्या करुळ घाटात दरड कोसळली, रस्ता पाण्याखाली गेल्याने कणकवली-आचरा मार्गही बंद

  • वैभववाडी-कोल्हापूर मार्गावर करुळ आणि भुईबावडा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. वरवडे पूल अपूर्ण असल्याने व मुसळधार पावसात रस्ता पाण्याखाली गेल्याने कणकवली-आचरा रस्ता बंद करण्यात आला आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : राज आणि उद्धव ठाकरेंवर युतीचं प्रेशर, संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, आता मनसेसोबत थेट… Sanjay Raut : राज आणि उद्धव ठाकरेंवर युतीचं प्रेशर, संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, आता मनसेसोबत थेट…
मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षात युतीच्या चर्चांनी राज्यात मोठे वादळ उठले होते. भाजपासह महायुतीला राज्यात पर्याय देण्यात...
मुंबई महापालिका निवडणुकीवरून संजय राऊत यांचं मोठं विधान, थेट सरकारला आव्हान काय ?
Mukul Dev death: ‘सन ऑफ सरदार’ सिनेमातील अभिनेता मुकूल देवचे वयाच्या 54व्या वर्षी निधन
शाहरुख खानने जवळ्या मित्राच्या लगावली कानशिलात, 150 कोटींच्या नुकसानाची उडवली होती खिल्ली
तमन्ना भाटियाची ‘मैसूर सँडल सोप’ सोडा, या साबणाच्या जाहिरातीने मोडल्या होत्या सर्व मर्यादा
मराठी माणसाच्या हितासाठी मतभेद सर्वांनी एकत्र यावे, ही उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे इच्छा – संजय राऊत
मुंबई गिळण्यासाठी निधी आणि पैशांचा खेळ सुरू आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका जिंकणे त्यांना शक्य नाही -संजय राऊत