IND Vs ENG – त्याला कसोटी संघात स्थान नाही…; श्रेयस अय्यरच्या पदरी पुन्हा निराशा; अजित आगरकरांनी सांगितलं कारण

IND Vs ENG – त्याला कसोटी संघात स्थान नाही…; श्रेयस अय्यरच्या पदरी पुन्हा निराशा; अजित आगरकरांनी सांगितलं कारण

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून इंग्लंडमध्येच पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी BCCI ने शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. उपकर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी लागली असून साई सुदर्शन आणि अर्शदप सिंगची पहिल्यांदाच कसोटी संघात निवड झाली आहे. परंतु जबरदस्त फॉर्मात असलेल्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकलेलं नाही.

श्रेयस अय्यरने रणजी करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडकात आपल्या खेळाचा तडाखा दाखवून दिला होता. सय्यद मुश्ताक अली करंडकात मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत संघाला विजेतेपद पटकावून दिले. आयपीएलमध्ये त्याने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली आणि पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करताना संघाला प्ले ऑफमध्ये घेऊन जाण्यात खारीचा वाटा उचलला. तसेच टीम इंडियाकडून खेळतानाही त्याचा खेळ दमदार राहिला आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवड होईल, अशी चाहत्यांना आशा होती. परंतु त्याला संधी मिळालेली नाही.

…आणि त्याला एक संधी मिळाली! टीम इंडियामध्ये झालं पुनरागमन, आता धमाका करणार?

बीसीसीआय संघनिवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये श्रेयस अय्यरच्या निवडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “हे खरं आहे की श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केलं आहे, परंतु सध्या कसोटी संघात त्याच्यासाठी कोणतीही जागा नाही”. श्रेयसने जानेवारी 2024 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले असून 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फक्त ‘या’ दोन गोष्टींपासून बनवा होममेड काजळ, डोळ्यांना मिळतील फायदे फक्त ‘या’ दोन गोष्टींपासून बनवा होममेड काजळ, डोळ्यांना मिळतील फायदे
आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल जीवनशैलीत, तासंतास मोबाईल आणि लॅपटॉप तसेच संगणकाच्या स्क्रीनसमोर बसून राहणे, प्रदूषण, धूळ आणि झोपेचा अभाव यांचा...
योग्य पत्ता न दिल्याने संतापला, झेप्टो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
कुठलीच कंपनी प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Pahalgam Attack : ज्यांच्या कपाळाचं कुंकू हिसकावलं गेलं, त्या महिलांमध्ये योद्ध्याची भावना-उत्साह नव्हता; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
समुद्रात बुडत होते परदेशी जहाज, तटरक्षक दल देवदूतासारखे धावून आले; 9 जणांची सुटका, 15 जण अडकले
महाराष्ट्र 2047 व्हिजन ते गुंतवणूक, नीती आयोगाच्या बैठकीतील फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
‘संजय राऊत यांची गाडी फुटणार नाही, त्यांनी फक्त…’, मनसे नेत्याचा खोचक टेला