Vaishnavi Hagawane case सात दिवसांनंतर सासरा, दिराला अटक; पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
सासरच्यांकडून हुंडय़ासाठी होणाऱया छळाला पंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटनेला सात दिवस उलटल्यानंतर पसार असलेला आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पिता-पुत्र अखेर शुक्रवारी (दि. 23) पहाटे साडेचारच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट येथे पोलिसांच्या हाती लागले. सात दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत लगतच्या तालुक्यातच वेगवेगळ्या भागांत आरोपी राजरोसपणे फिरत होते, तरीही पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अटक केलेल्या पिता-पुत्राला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, दोघांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (57), दीर सुशील राजेंद्र हगवणे (27) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये माहेरहून आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱया छळाला पंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (23, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुपूम, ता. मुळशी) या विवाहितेने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बावधन पोलिसांनी वैष्णवी शशांक हगवणे यांचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक केली. सध्या ते 26 मेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हे पिता-पुत्र गेले सात दिवस पोलिसांना गुंगारा देत होते. जिह्यातच तळेगाव, वडगाव-मावळ, आळंदी, तसेच सातारा जिह्यात राजरोसपणे ते फिरत होते. अखेर शुक्रवारी पहाटे दोघे आरोपी पिता-पुत्र पुण्यात स्वारगेट परिसरात बावधन पोलिसांच्या हाती लागले. घटना घडल्यानंतर पहिले चार दिवस आरोपी लगतच्या तालुक्यातच फिरत होते.
हगवणे बाप-लेकाला अटक केल्यानंतर या दोघांना दुपारी पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शशांक-वैष्णवीच्या लग्नात हगवणे यांनी आणखी कोणत्या गाडय़ा, हुंडा घेतला का? लग्नातील 51 तोळे सोने खासगी बँकेत तारण ठेवले आहे, त्यामागचे काय कारण आहे? फरार असताना ते कोठे वास्तव्यास होते? त्यांना कोणी आर्थिक मदत केली आहे का? यांसह गुह्याच्या सखोल तपासासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोघांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आरोपींचा फार्म हाऊस, लॉज, शेतावर मुक्काम
सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱया नराधम सासऱयाला आपल्या या पृत्याबद्दल जराही पश्चाताप नसल्याचे त्याच्या सात दिवसांतील प्रवासाने समोर आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य असणारा सासरा राजेंद्र हगवणे याला सत्तेचा माज असल्याचेच यातून दिसून आले आहे. पोलीस चौकशीत बलेनो, थार, इंडेव्हर अशा आलीशान कारमधून तो फिरल्याचे, फार्म हाऊस, लॉज, शेतावर राहत यथेच्छ पाटर्य़ाही झोडल्याचे आणि मटणावर ताव मारल्याचेही समोर आले आहे. पोलीसांनी आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या पिता-पुत्राला स्वारगेट येथे जेरबंद केले. पोलीस चौकशीत तो सात दिवस आपल्या शेजारच्या तालुक्यातच राजरोसपणे फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजेंद्र हगवणे गेल्या सात दिवसांत पुठे पुठे फिरला, याबाबत माहिती समोर आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List