धारूर तालुक्यातील कोयाळ येथे सख्ख्या भावंडांना सर्पदंश; दोघांचाही मृत्यू
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कोयाळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली.
प्रदीप मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. त्याने दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून मुंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एका घरातील दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List