अवकाळीने 22 हजार हेक्टर शेतीचा घास घेतला, उभ्या पिकांसोबत बळीराजाही कोलमडला

अवकाळीने 22 हजार हेक्टर शेतीचा घास घेतला, उभ्या पिकांसोबत बळीराजाही कोलमडला

राज्यातल्या 21 जिल्ह्यांतील तब्बल 22 हजार 233 हेक्टरवरील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. साधारणपणे 1 मेपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला, फळपिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात आकडा वाढण्याची शक्यता आहे; पण अस्मानी सुलतानीमुळे उभी पिके आणि बळीराजाही कोलमडून पडला आहे.

राज्यात ठाणे जिल्ह्यापासून पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 21 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 1 मेपासून अवेळी पावसाला सुरुवात झाली. सोबत वादळी वारे, व गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

कोणत्या पिकांचे नुकसान झाले

केळी, जांभूळ, आंबा, भात, चिकू, बाजरी, मका, डाळिंब, कांदा, भाजीपाला, पपई, मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग, संत्रा, धान, फळपिके.

चंद्रपूर जिल्ह्यात 1 हजार 38 हेक्टरवरील शेतीचे नुकसान यासंदर्भात अधिक माहिती देताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी 2023-24 मध्ये 54 लाख 80 हजार शेतकऱ्यांना 4 हजार 833 कोटी रुपये दिले होते. तर एप्रिल 24 ते 31 मार्च 25 या काळात 69 लाख 4 हजार शेतकऱ्यांना 9 हजार 989 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान

– अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, भातकुली, चांदूर बाजार, चिखलदरा तालुक्यातील तब्बल 10 हजार 636 हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान.
– जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा, अमळनेर तालुक्यातील 4 हजार 396 हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
– जालना जिल्ह्यातील अंबड, मंठा, बदनापूर, परतूर, जालना तालुक्यात 1 हजार 695 हेक्टर पिकांचे नुकसान.
– नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, बागलाण, त्रंबकेश्वर, सुरगाना, मालेगाव, दिंडोरी तालुक्यात 1 हजार 734 हेक्टरवर नुकसान.
– पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, डहाणू, वाडा, विक्रमगड, वसई तालुक्यातील 796 हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाची पथके स्थापन केली आहेत. – मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : राज आणि उद्धव ठाकरेंवर युतीचं प्रेशर, संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, आता मनसेसोबत थेट… Sanjay Raut : राज आणि उद्धव ठाकरेंवर युतीचं प्रेशर, संजय राऊत यांचं मोठं विधान; म्हणाले, आता मनसेसोबत थेट…
मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षात युतीच्या चर्चांनी राज्यात मोठे वादळ उठले होते. भाजपासह महायुतीला राज्यात पर्याय देण्यात...
मुंबई महापालिका निवडणुकीवरून संजय राऊत यांचं मोठं विधान, थेट सरकारला आव्हान काय ?
Mukul Dev death: ‘सन ऑफ सरदार’ सिनेमातील अभिनेता मुकूल देवचे वयाच्या 54व्या वर्षी निधन
शाहरुख खानने जवळ्या मित्राच्या लगावली कानशिलात, 150 कोटींच्या नुकसानाची उडवली होती खिल्ली
तमन्ना भाटियाची ‘मैसूर सँडल सोप’ सोडा, या साबणाच्या जाहिरातीने मोडल्या होत्या सर्व मर्यादा
मराठी माणसाच्या हितासाठी मतभेद सर्वांनी एकत्र यावे, ही उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे इच्छा – संजय राऊत
मुंबई गिळण्यासाठी निधी आणि पैशांचा खेळ सुरू आहे, बॅलेट पेपरवर निवडणुका जिंकणे त्यांना शक्य नाही -संजय राऊत