कुठलीच कंपनी प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कुठलीच कंपनी प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नोकरीच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ मिळणे हा महिलांच्या जगण्याच्या अधिकाराचाच एक पैलू आहे. कुठलीच कंपनी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्जल भुयाण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

प्रसूती रजा ही राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत महिलेच्या पुनरुत्पादक हक्कांचा आणि जगण्याच्या अधिकाराचा एक पैलू आहे. केवळ महिलेने जन्म दिलेले मूल तिसरे मूल होते किंवा तिच्या दुसऱ्या लग्नातून गर्भधारणा झाली होती, या कारणांवरून महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा नाकारता येत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

2021 मध्ये तामिळनाडूच्या सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने तिच्या दुसऱ्या लग्नातून झालेल्या गर्भधारणेनंतर प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता. ती 2012 मध्ये सरकारी सेवेत रुजू झाली होती. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुले झाली होती. 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतरही ती दोन्ही मुले पहिल्या पतीच्या ताब्यात राहिली होती. नंतर तिने दुसरे लग्न केले. तिने दुसऱ्या लग्नापासून एका मुलाला जन्म दिला.

2021 मध्ये जिल्हा शिक्षण कार्यालयाने तिचा प्रसूती रजेचा अर्ज फेटाळला होता. त्यात तामिळनाडू सरकारच्या नियम 101(अ) चा हवाला देण्यात आला होता. तो नियम फक्त दोनपेक्षा कमी मुले असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच प्रसूती रजेची मुभा देतो. महिलेचे सध्याचे मूल तिसरे मूल असल्याने तिला प्रसूती रजा नाकारली होती. त्यानंतर महिलेने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथे द्विसदस्यीय खंडपीठाने प्रसूती रजा नाकारण्याचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EU सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार; ट्रम्प यांची धमकी EU सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जूनपासून 50 टॅरिफ लादणार; ट्रम्प यांची धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन देशांवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत...
‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री
IPL 2025 – दिल्लीने शेवट गोड केला, पंजाबची दांडी केली गुल
फक्त ‘या’ दोन गोष्टींपासून बनवा होममेड काजळ, डोळ्यांना मिळतील फायदे
योग्य पत्ता न दिल्याने संतापला, झेप्टो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
कुठलीच कंपनी प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Pahalgam Attack : ज्यांच्या कपाळाचं कुंकू हिसकावलं गेलं, त्या महिलांमध्ये योद्ध्याची भावना-उत्साह नव्हता; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य