रिक्त पदे भरणार, तीन महिन्यांत तक्रारी सोडवणार; लढाऊ कामगार सेनेला पालिकेचे आश्वासन
On
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील दुय्यम अधिकारी, प्रमुख अग्निशामक ही पदे लवकरात लवकर भरण्यात येतील आणि कर्मचाऱयांच्या आस्थापनासंबंधित तक्रारी दोन ते तीन महिन्यांत सोडवण्यात येतील, असे ठाम आश्वासन अग्निशमन दल प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेला आज दिले.
अग्निशमन दलातील कर्मचारी, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रमुख अग्निशमन दल अधिकारी आंबुलगेकर यांच्यासोबत निर्णायक बैठक घेतल्याची माहिती बाबा कदम यांनी दिली. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत तळेकर, अनिल खराटे, चिटणीस मिलिंद वळंजू, अफजल कागदी, खजिनदार दशरथ धनवट, उप चिटणीस पुष्कर शिंदे यांच्यासह यावेळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सावंत, परब साहेब, पाटील, विभागीय अग्निशमन अधिकारी (दळणवळण)भोर, घाडीगांवकर आदी उपस्थित होते.
अशा आहेत इतर मागण्या
z सेवानिवृत्त कर्मचाऱयांचे आर्थिक दावे दोन महिन्यांत निकाली काढणार.
z कर्तव्यावर असताना मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक कोटी नुकसानभरपाई.
z भरती प्रक्रियेमध्ये कर्मचाऱयांच्या मुलांना पाच टक्के आरक्षण मिळावे.
z आयकार्डबाबत लवकरच प्रोसेस पूर्ण करून ते देण्यात येतील.
z प्रशिक्षण विभागात प्रशिक्षक वर्गास विशेष भत्ता देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येईल.
z दिवंगत कर्मचारी सदाशिव धोंडीबा कार्वे यांच्या मृत्यूपश्चात वारसांना दिली जाणारी आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.
z सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांच्या सेवानिवासस्थानाच्या शिल्लक रकमेचा परतावा 15 ते दीड महिन्यात मिळेल.
z सर्व प्रवर्गातील मंजूर शेडय़ुल पोस्टमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेष म्हणजे दुय्यम अधिकारी पदाच्या संख्येत 84 पदाची वाढ होणार आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 May 2025 14:05:36
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्याप्रकरणात राज्य महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाच्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे. रोहिणी...
Comment List