पोलिसाला मारहाणप्रकरणी एकाला अटक
On
पवई येथे फेरीवाल्याने पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच बोरिवली येथे पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणप्रकरणी गौरव शेलार याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
बोरिवली पोलीस ठाण्यात ते काम करतात. बुधवारी रात्री ते गस्त घालत होते तेव्हा बाभई नाका येथे गौरव हा त्याच्या सहकाऱयासोबत दारूच्या नशेत गोंधळ घालत होता. त्यांनी त्याला घरी जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्या चौघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या पोटाला, हाताला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती समजताच बोरिवली पोलीस घटनास्थळी आले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गौरवला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 May 2025 08:04:56
जर्मनीतील हॅमबर्ग सेंट्रल रेल्वे स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी एका हल्लेखोराने अनेक लोकांवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली. या चाकू हल्ल्यात किमान 12...
Comment List