नालेसफाईत दिरंगाई केली तर बिले मंजूर करणार नाही, केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचा ठेकेदारांना इशारा
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध प्रभागात सुरू असलेल्या नाल्याची आणि गटारांची सफाई कामे 31 मेपूर्वी पूर्ण करा असे सांगतानाच ही कामे निविदेतील अटी-शर्तीचे पालन न करता केली तर बिले मंजूर करणार नाही असा स्पष्ट इशारा महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी ठेकेदारांना दिला.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची योग्य सफाई व्हावी यासाठी आयुक्त गोयल स्वतः स्पॉट व्हिजीट करत आहेत. त्यांनी ‘जे’, ‘आय’, ‘ड’ आणि ‘ह’ प्रभागातील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवंगुळ, ‘ह’ प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप उपस्थित होते.
गाळ, कचरा दोन दिवसांत उचला !
नाल्यातून काढलेला गाळ आणि कचरा सुकल्यानंतर दोन ते तीन दिवसांत उचला अशा सक्त सूचना आयुक्त गोयल यांनी ठेकेदारांना दिल्या. साफसफाईसाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करा आणि कामाला गती द्या, असे सांगतानाच शहरात फिरून पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचे त्यांनी ठेकेदारांना सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List