‘संजय राऊत यांची गाडी फुटणार नाही, त्यांनी फक्त…’, मनसे नेत्याचा खोचक टेला

‘संजय राऊत यांची गाडी फुटणार नाही, त्यांनी फक्त…’, मनसे नेत्याचा खोचक टेला

गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एका मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वापुढे आमच्यामधील भांडणं, वाद हे किरकोळ आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत, आमच्यात कधीच भांडणं नव्हतीच असं म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू, यावर प्रतिक्रिया देताना आता मसने नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी मनसे आणि उद्धव ठाकरे  हे एकत्र येणार आणि ही भूमिका उद्धव ठाकरे यांची असल्याचे म्हटले होते, यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. नाते आहेच परतु, संजय राऊत यांनी माध्यमामधून न बोलता, ज्या प्रमाणे इतर नेते राज ठाकरे यांच्या घरी येऊन कॉफी पितात, त्यांच्याशी बोलतात, तसंच संजय राऊत यांनी देखील कॉफी प्ययाला यावे, त्यांची गाडी कोणी फोडणार नाही याची जबाबदारी मी घेईल, असा खोचक टोला यावेळी प्रकाश महाजन यांनी संजय राऊ यांना लगावला आहे.

दरम्यान दुसरीकडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी देखील राज  ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, परंतु नेहमीप्रमाणे ही लोकांची इच्छा वाऱ्यावर सोडली जाते, मधेच कुठेतरी माशी शिंकते आणि हा सर्व प्रश्न विस्कळीत होतो.

यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहेत, त्यांच्या बाजूने ते एकत्र येण्यासाठी तयार आहे आणि कुठल्याही अटी शर्ती त्यांच्या नाहीत, परंतु राज ठाकरे यांच्याकडे मध्येच लोक चहापानासाठी येतात,  कुणीतरी खिचडी खाऊन जाते,  जेवणावळी होतात, आणि त्याच्यामधून वेगवेगळे कयास केले जातात, असं उन्हाळे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;