कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, कर्जमाफीवरुन शेतकरी आक्रमक

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, कर्जमाफीवरुन शेतकरी आक्रमक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करू असे जाहीरनाम्यात सांगितले होते. तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नसल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मजले ता. हातकंणगले येथे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते.सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपवून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी 5 च्या सुमारास स्वा.शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सांगली-कोल्हापूर महामार्गावर मजले येथील पेट्रोल पंपाशेजारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.राज्यात दररोज 8 हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत.विधानसभा निवडणुका संपून जवळपास 8 महिने झाले तरीही सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही स्वा.च्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. अवकाळी पाऊस , दुष्काळ , वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपुर्ण कर्जमाफी करावे अन्यथा संपुर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;