भाजप नेत्याचे खुलेआम अश्लील कृत्य, महामार्गावरच महिलेसोबत रोमान्स; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. भाजप नेत्याने महामार्गावर कार रोखत खुलेआम महिलेसोबत शरीरसंबंध केल्याचे उघड झाले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली-मुंबई महामार्गावर ही घटना घडली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला कार उभी असल्याचे दिसत आहे. मोहनलाल धाकड कारमधून उतरून महिलेसोबत रस्त्यावरच खुलेआम शरीरसंबंध ठेवताना दिसत आहेत. ही घटना 13 मे 2025 रोजी 8.26 वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर भानुपरा पोलिसांनी धाकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोहनलाल धाकड हे उज्जैनमधील धाकड महासभेचे महामंत्री आहेत. पण सदर प्रकरणानंतर धाकड महासभेने त्यांना पदावरून निलंबित केले आहे. धाकड यांच्या पत्नी भाजप समर्थित जिल्हा पंचायत सदस्या असून मंदसौर जिल्हा पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 8 मधून त्या निवडून आल्या आहेत.
तोंडावर लघवी केली, व्हायरसचं इंजेक्शन दिलं! भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List