‘मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले…’, धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रक्कम प्रकरणात संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

‘मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले…’, धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रक्कम प्रकरणात संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

धुळ्यात शासकीय विश्रामगृहात एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. गुरुवारी पहाटे चार वाजता या रक्कमेची मोजणी संपली. विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आरोप शिवसेना उबाठा नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले, असा आरोप संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. या संदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ते त्या खोलीबाहेर ठिय्या लावून बसले होते. अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला होता. त्यासंदर्भात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी एकामागे एक दोन ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटले?

महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? असा प्रश्न करत संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, धुळे विश्राम गृहात राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. बुधवारी संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. खोलीत किमान ५ कोटी रुपये आहेत.

या ट्विटनंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, आत्ताची ताजी खबर, विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर आहे. या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथील रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते. विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत! उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच!

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या तीन बड्या नेत्यांचा आग्रह अन् मंत्रिपद मिळालं, भुजबळांनी थेट नावच घेतलं या तीन बड्या नेत्यांचा आग्रह अन् मंत्रिपद मिळालं, भुजबळांनी थेट नावच घेतलं
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला स्पष्ट...
‘तेव्हाच सगळं ठरलं होतं पण मी…’, मंत्रिपदाबाबत भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
कान्ससाठी गेलेल्या ऐश्वर्या अन् लेकीचं फ्रान्स विमानतळावर जंगी स्वागत, आराध्याला त्या व्यक्तीनं दिलं खास गिफ्ट
एका गुणी नटीचं असं होणं हे दुर्दैवच..; रंजनाबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?
ती डोळ्यांत पाणी आणून फक्त माफी मागत होती..; राज बब्बर यांनी सांगितली स्मिता पाटील यांच्या अखेरच्या क्षणांची आठवण
तुम्ही काळा लसूण खाल्लाय का? वाचा काळ्या लसणाचे आरोग्य फायदे
Vaishnavi Hagawane Case : मी दोषी असेन तर खुशाल फासावर लटकवा, पण उगीचच माझी बदनामी करता – अजित पवार