मुंबईत आजही कोसळणार मुसळधार पाऊस, 4-5 दिवस कसं असेल वातावरण ?

मुंबईत आजही कोसळणार मुसळधार पाऊस, 4-5 दिवस कसं असेल वातावरण ?

गेल्या दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावून मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस आजही मुंबईत आणि आसपसाच्या परिसरात कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईसह किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे नागिरकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे.

काल, मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. त्याच पार्श्वभूमीवर आजही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच पावसाने हजेरी लावल्याने अनेक नागरिकांची धावपळ झाली, त्रेधातिरपीट उडाली. मात्र आजही पावसाचा इशारा देण्यात आल्याने मुंबईकरांनी त्या तयारीनेच बाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपासून मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई शहरांमध्ये बुधवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. दहिसर येथे सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत 40 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. तर काल संध्याकाळनंतर पावसाने अधिकच जोर धरला होता

लोकलवरही परिणाम

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत काल मुसळधार पाऊस सुरू झाला. कोस्टल रोडभोवती जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळला. त्याचा परिणाम लोकल सेवेवरही दिसून आला. मध्य आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल गाड्या 10 मिनिटे उशीराने धावत होत्या. ठाणे ते पनवेल, ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते सीएसटी या लोकल गाड्याही 10 मिनिटे उशिराने धावत होत्या. अचानक आलेल्या या पावसाचा थेट परिणाम मध्य रेल्वेवर झाला.

पुढील 4 ते 5 दिवस पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता

राज्याचे हवामान सतत बदलत असते. कुठे तेजस्वी सूर्यप्रकाश आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते.

दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पालघरच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वादळ आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम मच्छिमारांवरही झाला आहे. डहाणू आणि पालघरमध्ये 40 ते 45 बोटींचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटी वादळाच्या तडाख्यात सापडल्या आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – मैत्रिणीच्या लग्नात अनन्याचा जलवा Photo – मैत्रिणीच्या लग्नात अनन्याचा जलवा
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या मैत्रिणीच्या मेहंदी मधील फोटो सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या लहेंग्यातील फोटोंनी...
उकडलेले अंडे की ऑम्लेट ? कुठले अंडे खाल्ल्याने वजन वेगाने घटते ?
राजधानीतील लाल किल्ला परिसरच सुरक्षित नसेल तर देशाच्या सुरक्षिततेचे काय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग; विमानतळावर हाय अलर्ट जारी
Nanded News – कुंडलवाडीत 21 लाख 50 हजारांची रोकड जप्त; आचारसंहिता काळातील मोठी कारवाई
सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
भरुचमध्ये फार्मा कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 2 कामगार ठार, 20 जण जखमी