पावसाळ्यात व्हायरल फ्लू टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा
पावसाळ्यात विषाणूजन्य संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते ज्यामुळे आपण वारंवार आजारी पडू लागतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण विषाणूजन्य संसर्गाला सहज बळी पडत नाही. या ऋतूत शरीर निरोगी ठेवण्यात आपला आहारही महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून, बाहेरील गोष्टींपासून दूर राहा आणि निरोगी गोष्टींचा अवलंब करा. तर मग पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहार कसा राखायचा ते बघुया.
पावसाळी हवामानात मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात हे बदल करायलाच हवेत
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या गोष्टींचे सेवन करावे
निरोगी आहार- पावसाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आहाराचे पालन करा. ताजी फळे, भाज्या आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ खा.
काढा- पावसाळ्यात त्याचा काढा बनवून पिणे फायदेशीर मानले जाते. दालचिनी, काळी मिरी, आले, तुळस आणि लवंग मिसळून तुम्ही काढा बनवू शकता.
लसूण- लसणामध्ये अॅलिसिन नावाचा घटक असतो, जो बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढतो. पावसाळ्यात कच्च्या लसणाच्या १-२ पाकळ्या खा.
सूप- पावसाळ्यात बाहेरील वातावरणात थंडावा असल्यामुळे, आपल्या शरीरामध्ये सूप जाणे हे खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात खासकरून विविध सूप बनवणे सर्वात हितावह आहे.
तुळशीचा चहा- तुळस आणि आल्यामध्ये अँटी-व्हायरल गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही तुळशीचा चहा पिऊ शकता.
गिलॉय ज्यूस- गिलॉय हे एक नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध आहे जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पावसाळ्यात तुम्ही गिलॉयचा रस घेऊ शकता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List