‘तेव्हाच सगळं ठरलं होतं पण मी…’, मंत्रिपदाबाबत भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

‘तेव्हाच सगळं ठरलं होतं पण मी…’, मंत्रिपदाबाबत भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आलं. मात्र त्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. मात्र त्यानंतर अखेर भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

मला काल मीडियाने विचारले, तुम्ही म्हणाले होते, ‘जहा नही चैना वहा नही रेहेना’  मग मी म्हणालो ‘देर आये दुरुस्त आये’  काही लोक थोड्या वेळ या घरात तर थोड्या वेळ त्या घरात असतात, अशा लोकांना हे दु:ख कळणार नाही. मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच नाही सांगितलं, असा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले. माझ्या पेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्यांना झाला, हा साप शिडीचा खेळ आहे. थोडं वर गेलं की खाली देखील येतं. चालूच असतं, त्याला कोण काय करणार. कधीकधी अशा गोष्टी पण घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो.

पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, आम्ही जेलमध्ये अडकलो होतो तेव्हा देखील आत बसून आपले लोक सभापती केले. तुम्ही जर अजितदादांच्या जास्त जागा निवडणून दिल्या तर फयदा आहे. आता सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढायची आहे.
अजितदादांनी सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाणार,  सगळ्यांना सोबत घेऊन महानगर पालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीत सगळ्यांना संधी द्यावी लागेल,  पडला तरी चालेल पण तो घटक आपला आहे. सगळ्यांसाठी प्रयत्न करायचे
तुम्ही सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत लोकांमध्ये राहायला हवं, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update : पुढचे 36 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर आता नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट IMD Weather Update : पुढचे 36 तास धोक्याचे, महाराष्ट्रावर आता नवं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा फटका हा राज्याला बसला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान...
तुम्ही देशाच्या सन्मानाची तडजोड केली; पंतप्रधानांना प्रश्न करत राहुल गांधी यांचा हल्लाबोल
Chhattisgarh Encounter – सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचा जवान शहीद; एका माओवाद्याचा खात्मा
IPL 2025 – पाऊस फक्त एक निमित्त, बंगालविरुद्ध कट रचला; तृणमूल काँग्रेसचा भाजपवर निशाणा
Photo – शिवसेना भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
Pune News – आंबेगावमध्ये मुसळधार पाऊस, चास-घोडेगाव रस्त्यावरील पूल गेला वाहून
जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या विरोधात CBI चे आरोपपत्र दाखल