कान्ससाठी गेलेल्या ऐश्वर्या अन् लेकीचं फ्रान्स विमानतळावर जंगी स्वागत, आराध्याला त्या व्यक्तीनं दिलं खास गिफ्ट

कान्ससाठी गेलेल्या ऐश्वर्या अन् लेकीचं फ्रान्स विमानतळावर जंगी स्वागत, आराध्याला त्या व्यक्तीनं दिलं खास गिफ्ट

आतापर्यंत, जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी 78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे. हा कार्यक्रम 13 मे रोजी सुरू झाला आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण रेड कार्पेटवर दिसले. आतापर्यंत, जॅकलिन फर्नांडिस, उर्वशी रौतेला, जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यासारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि भारतीय प्रभावशाली कलाकारांनी कान्स 2025 मध्ये त्यांच्या लूकने चाहत्यांना प्रभावित केलं आहे. पण आता अखेर ज्या सौंदर्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते ती सौंदर्यवतीने अखेर कान्सच्या रेड कार्पेटवर आपली सुंदर झलक दाखवली. पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने तिने सर्वांची मने जिंकली आहेत. ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये ऐश्वर्याचीच चर्चा

दरवर्षी या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या आवर्जून हजेरी लावते आणि तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होते. ऐश्वर्याने आयव्हरी रंगाची साडी, त्यावर टिश्यू सिल्क दुपट्टा, गळ्यात रुबीची माळ आणि या सर्वांत जास्त चर्चेत आलं ते म्हणजे ऐश्वर्या राय बच्चनच्या भांगेतील लाल सिंदूर.. यातून तिला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.त्यामुळे नक्कीच तिच्या या लूकची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत कान्समध्ये येण्यासाठी जेव्हा ती फ्रान्स विमानतळावर पोहचली तेव्हा तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत कान्समध्ये पोहोचली

78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या बच्चनसोबत फ्रान्सला पोहोचली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती फ्रान्समधील नाइस विमानतळावर दिसली. यावेळी त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले.

विमानतळावर आराध्याला दिलं खास गिफ्ट

ऐश्वर्या रायचा हा व्हिडिओ तिच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ऐश्वर्याने पांढऱ्या शर्ट आणि निळ्या ओव्हरकोटमध्ये दिसत आहे आणि तिच्यासोबत आलेल्या आराध्याने निळ्या जीन्ससह काळा लांब कोट परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये, ऐश्वर्या विमानतळावर तिचे स्वागत करणाऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याचे दिसत आहे, ज्याने आराध्याला एक खास भेटही दिल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही खूप आनंदी दिसत होत्या.


चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

ऐश्वर्याचे चाहते त्यांचा आवडता स्टार अखेर फ्रेंच रिव्हिएरा येथे पोहोचल्याचे पाहून खूप आनंदी झाल्याचहं दिसलं. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले की ‘अखेर ऐश्वर्या आली आहे, , मी कान्समध्ये तुला पाहायला खूप उत्साहि आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, ‘ती परत आली आहे, मी खूप दिवसांपासून तिची वाट पाहत होतो.’ तर एकाने लिहिले ‘आता कान्समध्ये काहीतरी धमाकेदार होण्याची आशा आहे.’अशापद्धतीने सर्वांनाच कान्समध्ये ऐश्वर्याला पाहून आनंद झाला होता.

2002 पासून ते 2025 पर्यंत कान्समध्ये ऐश्वर्याचाच डंका  

ऐश्वर्या राय बच्चन 22 मे रोजी लॉरियल पॅरिसची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून रेड कार्पेटवर चालताना दिसली. रेड कार्पेटवर तिचा हा 22 वा वॉक होता. ज्याबद्दल अभिनेत्रीचे चाहते खूप आनंदी आहेत. 2002 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘देवदास’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला तेव्हा ऐश्वर्याने रेड कार्पेटवर पदार्पण केले. यावेळी ती रथावर स्वार होऊन कान्समध्ये पोहोचली आणि यावेळी शाहरुख खान आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी देखील तिच्यासोबत उपस्थित होते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मध्यरात्री सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारी मुलगी नक्की आहे तरी कोण? मध्यरात्री सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणारी मुलगी नक्की आहे तरी कोण?
सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 19 मे च्या मध्यरात्री एका महिलेने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा...
Healthy Lifestyle: हृदय विकारापासून बचावासाठी ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर करा….
Gond Katira: गोंद कतीऱ्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका? खरं की खोटं जाणून घ्या एका क्लिक वर….
copper stored water: तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या दुष्परिणाम
कलाम : द मिसाईल मॅन, ओम राऊत यांनी केली कलाम यांच्यावरील बायोपिकची घोषणा, ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
Photo – ही तर बार्बी डॉल! नितांशीचा हा लूक पाहून चाहते घायाळ
US Plane Crash – अमेरिकेत पुन्हा विमान अपघात, सॅन दिएगोमध्ये विमान कोसळल्याने 15 घरांना आग; प्रवाशांचा मृत्यू