90s च्या जमान्यात जायचंय? तर हे Whatsapp चं नवं Walkie Talkie फिचर वापरा!

90s च्या जमान्यात जायचंय? तर हे Whatsapp चं नवं Walkie Talkie फिचर वापरा!

व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येतो. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस म्युझिक हे फिचर लॉन्च केले होते. म्हणजेच इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवरही आपण गाणी लावू शकतो. या नव्या फिचरमुळे युजर्सला लाखो गाण्यांच्या पर्यायातून आवडत्या गाण्यासोबत फोटो जोडता येईल. दरम्यान आता व्हॉट्सअ‍ॅपने Whatsapp walkie talkie हे नवे फिचर लॉन्च केले आहे. या फिचरचा नेमका वापर काय हे आपण जाणून घेणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅपचे वॉकी टॉकी हे फिचर फक्त ग्रुपपुरते मर्यादित आहे. कोणत्याही ग्रुपच्या चॅट बॉक्समध्ये जा. त्यानंतर चॅटमध्ये जाऊन स्वाईपअप करा. तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपचे वॉकी टॉकी हे फिचर चालू होईल. यानंतर ग्रुपमधील कोणताही व्यक्ती तुम्हाला जॉईन होऊ शकतो. वॉईस चॅट असा मॅसेज आला तर वॉकी टॉकी फिचर चालू झाले असे समजावे. यावेळी जर बाकी ग्रुपच्या मित्रांना आपल्याला याबद्दल सांगायचे असेल तर वॉईस चॅटच्या बाजूला वेव्हिंग हॅन्ड दिसेल त्यावर क्लिक करा. यामुळे तुमच्या इतर मित्रांना या फिचर बाबात माहिती मिळेल.

Whatsapp Status व्हॉट्सऍपवर आता म्युझिकचे स्टेट्स ठेवा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;