घाबरून जाऊ नका, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर डॉक्टरांचा सल्ला; काळजी घेण्याचे केले आवाहन
गेल्या वर्षभरात राज्यात कोरोनाचे 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण हे मे महिन्यात आढळले आहेत. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही असे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कोरोना हा आपल्यातच राहणार आहे, योग्य काळजी घेतली तर कुठलाही धोका राहणा नाही असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.
इंडियन एक्सप्रेसने या बाबती वृत्त दिले आहे. पुण्यात एका 87 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना आधी सर्दी आणि खोकल्याची लक्षणं दिसली होती. तसेच श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यांची कोरोनोची चाचणी पॉझिटिव्ह निघाली. पण उपचारानंतर ते बरे झाले आणि घरीही गेले.
पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की सर्दी खोकला असल्यास कोरोना चाचणीची गरज नाही. पण ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नाही त्यांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
डॉ. झिप्रे म्हणाले की काळजी करण्याचे कारण नाही. दर तीन वर्षांनी ओमिक्रॉन संबंधित व्हेरियंट आणि त्यासंबंधित लक्षणं असल्यास ते उपचार दिले जातात. असे असले तरी श्वास घेण्यास अडचण येणे, अंग दुखणे आणि अस्वस्थ वाटत असल्यात तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे. अशा वेळी योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि पॅरासिटोमॉल घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी घेतला आहे.
केईएम रुग्णालयातले डॉक्टर राजेश गडिया म्हणाले की राज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊ पडला. त्यामुळेच सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. असे असले तरी त्यांना सौम्य लक्षणं आहेत असेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List