मस्त! अॅपल कंपनी आता स्लिम आयफोन आणणार, नवीन 17 सीरिजकडे चाहत्यांचे लक्ष
आयफोन युजर्सचे आता आयफोन 17 सीरिजकडे लक्ष लागले आहे. अॅपल कंपनी सप्टेंबर 2025 मध्ये या सीरिजला लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरिजमध्ये आयफोन एअर हा नवीन फोन ग्राहकांसाठी आणला जाणार असून हा फोन स्लिम आयफोन असणार आहे. अॅपल या वर्षी एकूण चार आयफोन लाँच करणार आहे. यात आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि पहिल्यांदाच एक नवीन स्लिम आयफोन 17 एअर हा फोन लाँच करणार आहे. ज्या युजर्सला स्लिम फोन आवडतो. त्यांच्यासाठी अॅपलने स्लिम आयफोन आणण्याचे ठरवले आहे. आयफोन 17 लासुद्धा रीडिझाईन करण्यात आले असून यात बॅक कव्हर, कर्व्ड फ्रेमसोबत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. अॅपल कंपनी दरवर्षी नवीन आयफोन सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच करते. त्यामुळे यंदाही नवीन 17 सीरिज सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची दाट शक्यता आहे. हिंदुस्थानात आयफोन 17 ची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर आयफोन 17 प्रो मॅक्सला 1 लाख 64 हजार 900 रुपयांत मार्पेटमध्ये आणले जाऊ शकते.
नव्या आयफोनचे फीचर्स
आयफोन 17 च्या बेस मॉडलमध्ये अपग्रेडेड 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असू शकतो. यामुळे शार्प सेल्फी आणि व्हिडीओ कॉलमध्ये अजून जास्त क्वॉलिटी मिळू शकते. रियरवर आयफोन 16 सारखा डय़ुअल लेन्स सेटअप मिळू शकतो. म्हणजेच 48 मेगापिक्सलचा प्रायमरी पॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स मिळू शकतो. स्लिम बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी आयफोन 17 एअर फोनमध्ये सिंगल 48 मेगापिक्सलचा फ्युजन रियर कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List