आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत
महाराष्ट्रात लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठा हात असलेल्या आणि त्यानंतर ईडीच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनात सोहळ्यात संजय राऊत यांची तोफ धडाडली. आम्हाला तुरुंगात टाकले पण आमच्यासह अनेकांना ईडीखाली तुरुंगात राहावे लागले. येथे या कार्यक्रमाला तृणमुल काँग्रेसेचे खासदार साकेत गोखले पश्चिम बंगाल येथून आले आहेत. ते मला सिनियर आहेत कारण माझ्या पेक्षा त्यांना अधिक तुरुंगवास भोगवा लागला असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
तुरुंगात असताना माझे सहकारी अनिल देशमुख होते. आम्ही तुरुंगात असताना माझा रोखठोक कॉलम येत होता. माझा अग्रलेख रोज येत होता, हे मला बरं वाटत होतं. माझ्यासारखा माणूस कधीच खचत नाही. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही राहीलो आहोत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. एकदा रात्री ११.३० वाजता मला दोन अधिकाऱ्यांनी तुरुंगात उठवले, स्टेटमेंट घ्यायला आलो आहोत असे सांगितले. मी त्या टोपीवाल्या राज्यपालांवर लिहीले होते. इन्कवायरी लागली. मला विचारण्यात तुम्ही तर तुरुंगात आहात मग तुमचे लेख सामनात कसे काय येत आहेत. मी त्यांना म्हणालो की सीसीटीव्ही तपासा. नंतर त्यांना सांगितले की हे राज्यपाल काय करणार आहे हे मला माहीती होते. त्यामुळे आधीच लिहून ठेवल्याचे आपण त्यांना सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले तेव्हा उपस्थितात एक हशा उसळला.
ईडीने तुरुंगात टाकलेला मी शेवटचा माणूस होतो, ज्याने ईडीशी पंगा घेतला. हे सगळे या कार्यक्रमाला आलेले सर्व आपल्या प्रेमापोटी आलेली ही माणसे आहेत. आपल्या नैतिक लढाईत त्यांनी नैतिक पाठिंबा दिला. जे लिहीलंय ते सत्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे माझी खरी ओळख झाली. जावेद अख्तर हे देखील या प्रकाशन सोहळ्याला आले होते. त्यांना उद्देश्यून संजय राऊत म्हणाले की जावेद साहेब यांनी लिहीलंय,
जो बात कहते डरते है सब, वो बात तू लिख
इतनी अंधेरी थी न कभी पहले रात, लिख..
संजय राऊत पुढे म्हणाले की शरद तांदळे, साकेत गोखले, संजय सिंह, अनिल देशमुख कोणासमोर झुकले नाही. जावेद साहेब आम्ही हे पुस्तक लिहीयाचं ठरवलं तेव्हा. दिवार आणि शोलेत जसा दरवाजा आहे, तसा छोटा दरवाजा आहे. तेथे जगाशी संपर्क तुटतो. बाहेरचा संपर्क नाही. भिंती बघायच्या दगडांच्या. लिहीयाचं. वाचणे, एखादा सुटला तर त्याचे जजमेंट वाचत बसायचं. त्यामुळे तुरुंगात जो जातो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो. आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी त्याला कोणता जज, कोणते कोर्ट काय आहे याचं सर्व ज्ञान होते असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List