ईव्ही चार्जिंगसाठी वीज वापरण्यात दिल्ली अव्वल
शहरी भागात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. एका नवीन अहवालानुसार राजधानी दिल्लीत सर्वाधिक ईव्ही वाहनांचा वापर होत असल्याचे दिसते. कारण आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये फेब्रुवारीपर्यंत देशातील ईव्ही चार्जिंग स्टेशनवरील एकूण वीज वापराच्या 40 टक्क्यांहून अधिक वाटा दिल्लीने घेतला, तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. या कालावधीत हिंदुस्थानात ईव्ही चार्जिंग स्टेशनवर एकूण 76.3 कोटी युनिट वीज वापरली गेली.
फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीतील ईव्ही चार्जिंग स्टेशन्सवरील विजेचा एकूण वापर 8.33 कोटी युनिट्स होता, जो एप्रिल 2024 मध्ये 5.3 कोटी युनिट्स एवढा होता. राजधानीतील वीज वितरण कंपनी बीएसईएसने दिल्लीत 2000 हून अधिक ठिकाणी सुमारे 5,000 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स उभारल्यामुळे एक मजबूत चार्जिंग नेटवर्क तयार झाले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List