ट्रम्प सरकारला मूडीजचा धक्का, अमेरिकेची क्रेडिट रेटिंग केली कमी; काय आहे कारण? वाचा…
अमेरिकन सरकार सतत वाढत्या कर्जावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. याचा परिणाम क्रेडिट रेटिंगवर दिसून येत आहे. यातच जागतिक रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने ट्रम्प सरकारला धक्का देत अमेरिकेची क्रेडिट रेटिंग कमी केले आहे. मूडीजने अमेरिकेची रेटिंग गोल्ड-स्टँडर्ड Aaa वरून Aa1 पर्यंत कमी केली आहे.
याच संदर्भात माहिती देताना मूडीजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “गेल्या दशकभरात अमेरिकेचे सरकारी कर्ज आणि त्यावरील व्याजाचे प्रमाण इतर समान रेटिंग असलेल्या देशांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढले आहे. 2024 मध्ये अमेरिकेची आर्थिक तूट जीडीपीच्या 6.4 टक्के होती, ती 2035 पर्यंत 9 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामागील प्रमुख कारणे म्हणजे कर्जावरील वाढते व्याज, सामाजिक सुरक्षा खर्च (Social Security Expenses) आणि मर्यादित कर उत्पन्न. याशिवाय ट्रम्प यांच्या 2017 च्या कर कपात धोरणाचा विस्तार केल्यास पुढील दशकात प्राथमिक तुटीत 4 ट्रिलियन डॉलर्सची भर पडेल, असे मूडीजने म्हटले आहे. दरम्यान, हा निर्णय ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा धक्का मानला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List