Kedarnath helicopter Crashed – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

Kedarnath helicopter Crashed – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

केदारनाथमध्ये लँडिग दरम्यान हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टरमधील पायलटसह तीनही लोक सुखरुप आहेत. ऋषिकेश एम्सहून रुग्णाला घेण्यासाठी ही हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्स केदारनाथमध्ये आली होती.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवणारी ही संजीवनी हेली अ‍ॅम्बुलन्स केदारनाथमध्ये एका रुग्णाला घेण्यासाठी आली होती. हेली अ‍ॅम्बुलन्समध्ये पायलटसह दोन डॉक्टर होते. लँडिंग करत असताना हेलिपॅडपासून 20 मीटर अंतरावर हेलिकॉप्टर अनियंत्रित होऊन कोसळले. पायलटच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हेलिकॉप्टरमधील पायलट आणि दोन डॉक्टरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले....
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण
आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत
दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू