फोर्ब्सच्या 30 अंडर 30 आशियात हिंदुस्थानचा दबदबा
फोर्ब्सने आपली 10 वी वार्षिक 30 अंडर 30 आशिया यादी जाहीर केली आहे. या यादीत हिंदुस्थानचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या यादीत सर्व जण हे 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या यादीत एकूण 300 जणांची नावे असून 94 जण हे हिंदुस्थानातील आहेत. हिंदुस्थाननंतर ऑस्ट्रेलिया 32, चीन 30, जपान 25, दक्षिण कोरिया 23 तर सिंगापूर आणि इंडोनेशियाचे प्रत्येकी 19-19 जणांचा समावेश आहे. या यादीत आपापल्या क्षेत्रातील सर्वात जास्त हरहुन्नरी बिझनेसमॅन, राजकीय नेते, प्रतिभावंत खेळाडू, सिने कलाकार यांचा समावेश आहे. हिंदुस्थानातील चेस ग्रँडमास्टर गुकेश डोमराजू याचाही समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List