दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू
दिल्लीतील पहाडगंज भागात शनिवारी निर्माणाधीन इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आणखी तीन जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. दिल्ली पोलिसांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथके घटनास्थळी पोहोचली. ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. ही इमारत कशी काय कोसळली, हे अद्याप कळलेले नाही. स्थानिक प्रशासनाने येथील परिसर रिकामा केला आहे आणि बचावकार्य सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
#UPDATE दिल्ली के पहाड़गंज इलाके में एक निर्माणाधीन इमारत गिरने से 2 लोगों की मौत हो गई: दिल्ली पुलिस https://t.co/IViqm66QJu
— ANI_HindiNews (@AHindinews) May 17, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List