बँक खातेधारकांना वारसांचा ई-मेल द्यावा लागणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने ठेवीदारांच्या हिताचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी ‘बँक नामांकन फॉर्म’मध्ये वारसदाराची माहिती जोडण्याची सूचना केली आहे. यामध्ये खातेदाराला संबंधित वारसदारांचा ई-मेल आणि फोन नंबर द्यावा लागेल. अलीकडेच संसदेने बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 मंजूर केले आहे. या दुरुस्तीनुसार, आता बँकेतील खातेधारक चार वारसदारांची नावे देऊ शकतात. आरबीआयला सर्व वारसदारांचे ई-मेल आयडी आणि फोन नंबर बँकेकडे हवे आहेत.
आरबीआयने यासंदर्भात देशातील बँकांकडून सूचना मागवल्या आहेत. या बदलासाठी बँकिंग कंपनी नामांकन नियम, 1985 मध्येदेखील सुधारणा आवश्यक असेल. जर बँकेकडे चार वारसदारांचे ई-मेल आयडी आणि फोन नंबर असतील, तर खातेदाराच्या अनुपस्थितीत बँक त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधू शकते. सध्या खातेधारक वारसदाराचे नाव देतात, परंतु बँकेकडे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे कोणतेही साधन नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List