इंटरनेट आणि सिमकार्डशिवाय आता व्हिडीओ पाहता येणार!

इंटरनेट आणि सिमकार्डशिवाय आता व्हिडीओ पाहता येणार!

हातातील स्मार्टफोनवर व्हिडीओ किंवा टीव्ही पाहायची असेल तर त्यासाठी इंटरनेट किंवा सिमकार्ड हवे असते. त्याशिवाय युजर्स व्हिडीओ पाहू शकत नाहीत, परंतु लवकरच इंटरनेट आणि सिमकार्डशिवाय टीव्ही आणि व्हिडीओ पाहता येणार आहेत. देशात सध्या डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच डीटूएम टेक्नोलॉजीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही टेक्नोलॉजी लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. या टेक्नोलॉजीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ही टेक्नोलॉजी बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ही टेक्नोलॉजी बाजारात येईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर देशातील कोट्यवधी स्मार्टफोन युजर्सला ही सुविधा उपलब्ध केली जाईल. या नव्या टेक्नोलॉजीमुळे मोबाईलवर इंटरनेटशिवाय टीव्ही आणि व्हिडीओ पाहता येतील.

बंगळुरू येथील सांख्य लॅब्सने ही एक खास चिप डेव्हलप केली आहे. मोबाईल फोन थेट सॅटेलाइट किंवा ब्रॉडकास्ट टॉवरद्वारे कंटेंट मिळवू शकतो. आयआयटी कानपूरसंबंधित फ्री स्ट्रीम टेक्नोलॉजीज या स्टार्टअपच्या सहकार्याने ही चिप डेव्हलप केली आहे. या चिपचा उद्देश स्वस्तात इंटरनेट उपलब्ध करणे, नेटवर्कवरचा लोड कमी करणे आणि देशाच्या कानाकोपऱ्याची माहिती देशभर पोहोचवणे या संशोधनामागील प्रमुख कारण आहे. सध्या मोबाईलवर कोणताही व्हिडीओ पाहायचा असेल तर इंटरनेटची आवश्यकता असते. परंतु, डीटूएम टेक्नोलॉजी आल्यानंतर याची गरज भासणार नाही. ही टेक्नोलॉजी नेमकी कशी असेल यासंबंधी अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर या टेक्नोलॉजीची सविस्तर माहिती कळू शकणार आहे. मोबाईल फोन थेट सॅटेलाइट किंवा ब्रॉडकास्ट टॉवरद्वारे कंटेंट मिळवू शकते, असे सध्या सांगितले जात आहे.

डीटूएम टेक्नोलॉजी काय आहे

डीटूएम टेक्नोलॉजीमुळे स्मार्टफोन युजर्सला इंटरनेटशिवाय तसेच कोणत्याही सिमकार्डशिवाय मोबाईलवर टीव्ही चॅनेल्स व व्हिडीओ कंटेंट पाहता येईल. डीटूएमद्वारे थेट मोबाईलवर ब्रॉडकास्टिंग केले जाईल. माहिती आणि मनोरंजनाचा कंटेंट फ्रीमध्ये पाहता येईल. या टेक्नोलॉजीमुळे मोबाईल नेटवर्कवरील ट्रफिक कमी होण्यास मदत मिळेल. तसेच इंटरनेट डेटाची बचत होईल. ज्या ठिकाणी ब्रॉडबँड नेटवर्क पोहोचले नाही, त्या ठिकाणीही ही सेवा पोहोचेल. इंटरनेट सेवा ठप्प झाली तरीही डीटूएम सेवा वापरता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत आठ दिवस जरी तुरुंगात राहीला तरी तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो…काय म्हणाले संजय राऊत
महाराष्ट्रात लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठा हात असलेल्या आणि त्यानंतर ईडीच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या...
दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू
Photo – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याला खच्चून गर्दी
ट्रम्प सरकारला मूडीजचा धक्का, अमेरिकेची क्रेडिट रेटिंग केली कमी; काय आहे कारण? वाचा…
चापट मारली, नाका-तोंडातून रक्त; चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
विशिष्ट नमुन्यात जात प्रमाणपत्र नसेल तर नोकरभरतीत आरक्षण नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Mumbai News – मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर