पश्चिम रेल्वेवर आज 4 तासांचा जम्बोब्लॉक, कुठे, कधी, वेळ तर जाणून घ्या
मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकल अविरत धावत असते. रोजच्या रोज लाखो प्रवाशांचा, चाकरमान्यांचा भार वाहणाऱ्या या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वेळोवेळी देखभालीच्या, दुरूस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असतो. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेच्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि माहिम स्थानकांदरम्यान आज रात्री 4 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे, मात्र पश्चिम रेल्वेवर उद्या अर्थात रविवार, 04 मे 2025 रोजी दिवसा कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. आज कोणत्या मार्गावर, कधी, किती वेळ ब्लॉक असेल ते सविस्तर जाणून घेऊया.
पश्चिम रेल्वेवर 4 तासांचा जम्बो ब्लॉक
रेल्वेमार्ग, सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेद्वारे आज शनिवार आणि रविवार च्या मध्यरात्री 00.15 ते पहाटे 4.15 या वेळेत चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई सेंट्रल आणि माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन फास्ट लाईनवर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी याची प्रसिद्धी पत्रकानुसार माहिती दिली आहे.
या ब्लॉकच्या कालावधीत सर्व फास्ट लोकल गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान स्लो लाईनवर वळवण्यात येणार आहेत. या संदर्भातील अधिक माहिती संबंधित स्थानकप्रमुखांकडे उपलब्ध आहे. मात्र हा ब्लॉक फक्त पहाटेपर्यंतच असेल. उद्या, रविवारी, 4 में रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात अथवा त्या मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल. त्यामुळे सुट्टीनिमित्त बाहेर जाणाऱ्या, फिरायला जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू शकेल.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळे सोमवारी मूक निदर्शने करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिक्त पदामुळे मोटरमनना जादा काम करावे लागते. त्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच, दीर्घकाळापासून मोटरमनच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. परिणामी, 4 मेपासून नियमांनुसार काम करण्याचा आणि कोणतेही ‘जादा काम’ न करण्याचा निर्णय समस्त मोटरमननी घेतला असल्याचे माहिती समोर आली आहे. परिणामी, प्रवाशांना सोमवारी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List