Beed Crime – तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू, बीडमध्ये टोळक्यांकडून तरुणाला काठी, बेल्टने बेदम मारहाण

Beed Crime – तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू, बीडमध्ये टोळक्यांकडून तरुणाला काठी, बेल्टने बेदम मारहाण

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जलालपूर भागात तरुणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये टोळक्यातील एक-एक करून प्रत्येक जण काठी, बेल्टने तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, अभ्यासाचा ताण,कुटुंबाच्या अपेक्षांचा भार

बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर या जिल्ह्यातील गुंडगिरीची अनेक प्रकरणं समोर आली होती. आता या सर्व घटना मागे पडत असतानाच परळी तालुक्यातील बेदम मारहाणीची ही नवी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परळीतील जलालपूर भागात टोळक्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. परळी शहरातील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून 10 ते 12 जणांच्या टोळक्याने पीडित तरूणाचे अगोदर अपहरण केले. यानंतर टोळक्याने तरूणाला अमानुषपणे मारहाण केली आहे. अजूनही या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

अजित पवार दौऱ्यावर असताना नांदेडमध्ये गोळीबार, एक जण ठार

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणार्‍या माथेफिरूंना लवकरात लवकर अटक करावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पथके रवाना केली आहेत. आरोपींची ओळख उघड करण्यात आली आहे. एफआयआर नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;