96 टक्के! जुळ्यांचे गुणही जुळले!! बीडच्या जुळ्या बहिणींची कमाल

96 टक्के! जुळ्यांचे गुणही जुळले!! बीडच्या जुळ्या बहिणींची कमाल

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यशोगाथा ऐकायला मिळत असताना बीड जिह्यातील जुळ्या बहिणींनी अगदी सेम टु सेम गुण मिळवून सर्वांचेच लक्ष वेधले. आष्टी येथील धीरज देशपांडे यांच्या जुळ्या मुली अनुष्का आणि तनुष्का दोघींनी दहावीत 96 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. एकसारखे गुण मिळाल्यामुळे संपूर्ण जिह्यात या जुळ्या बहिणींची चर्चा आहे. आष्टीच्या दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या या बहिणी अभ्यासात सुरुवातीपासून हुशार होत्या असे शिक्षकांनी सांगितले.

मात्र दोघींना अगदी समान गुण मिळतील याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्या दोघी एकत्र अभ्यास करत होत्या. दोघींनाही नृत्याची आवड असून त्या शालेय उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायच्या. एकसारखे गुण मिळतील याबाबत विचारही केला नव्हता. मात्र निकाल लागल्यावर खूप आनंद झाला, असे अनुष्का देशपांडे हिने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेल्वे स्थानकात आता ऑफिस-कॉलेजचे काम करा, या स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज रेल्वे स्थानकात आता ऑफिस-कॉलेजचे काम करा, या स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज
मुंबई सेंट्रल स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे. या डिजिटल लाऊंजमध्ये अगदी विमानतळासारख्या सोयी आणि सुविधा मिळणार आहेत. भारतीय...
हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते पण, धर्म… संजय राऊत यांच्या पुस्तकातील दावा काय?
उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना चालना: २०२५-२६ रेल्वे बजेटमध्ये MUTP प्रकल्पांसाठी १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर
विराट-अनुष्का व्यतिरिक्त या स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त; कुंजला पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी
अनेक महिलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात, आज वयाच्या 58 व्या वर्षी 26 वर्ष लहान तरुणीसोबत करतोय संसार
‘तुला ब्लाउज काढावं लागेल’, बिग बींच्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी करताच…
‘एक नंबर, तुझी कंबर…’ लाल रंगाची साडी, केसात गजरा; जब्याच्या शालूचा जबरदस्त डान्स; वजन वाढल्यामुळे ट्रोल