इस्रो उद्या 101 वा उपग्रह प्रक्षेपित करणार, व्ही. नारायण यांची व्यंकटेश्वर मंदिरात पूजा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो 18 मे रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 5.59 वाजता आपल्या 101 व्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रो पीएसएलव्ही-सी61 मिशनद्वारे ईओसी-09 (आरआयएसएटी-1बी) उपग्रह प्रक्षेपित करेल. यामुळे पृथ्वीचे निरीक्षण आणि देखरेख करण्याची क्षमता आणखी वाढणार आहे. उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी शुक्रवारी इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी तिरुपती येथील व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना केली.
इस्रोने या वर्षी जानेवारीमध्ये श्रीहरिकोटा येथून त्यांचे 100 वे रॉकेट यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. आता 18 मे रोजी हिंदुस्थानचा 101 वा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल, असे नारायण यांनी म्हटले. देखरेख, दूरवरून माहिती गोळा करणे हे या उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट असून यामुळे देशाची सुरक्षा आणि बचाव कार्यात मोठी मदत होणार आहे. इस्रोच्या सर्व मोहिमा देशाची सुरक्षा आणि गरजा लक्षात घेऊन केल्या जातात. हिंदुस्थान इतर कोणत्याही देशाशी स्पर्धा करत नाही, असे इस्रोचे अध्यक्ष म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List