Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
हलगरा पाटीजवळ शनिवारी दुपारी मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वारासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. काशीनाथ शंकर कांबळे, जिजाबाई काशीनाथ कांबळे आणि क्रांतीकुमार काशीनाथ कांबळे अशी मयतांची नावे आहेत.
निलंगा येथील रहिवासी असलेले काशीनाथ कांबळे पत्नी आणि मुलासह मोटारसायकलवरून शहाजानीकडे चालले होते. यादरम्यान मौजे हलगरा पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलची क्रूझरला धडक बसली. यात कांबळे कुटुंबाचा जागीच करुण अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच औराद शहाजानी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृतदेह मौजे हलगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List