Nanded Rain – अवकाळी पावसाने नांदेडला झोडपलं; शहर जलमय, तुंबलेल्या नाल्यांमुळे अनेक घरांत शिरलं पाणी

Nanded Rain – अवकाळी पावसाने नांदेडला झोडपलं; शहर जलमय, तुंबलेल्या नाल्यांमुळे अनेक घरांत शिरलं पाणी

शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावस पडला. पावसामुळे नायगाव तालुक्यात वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर पाच तास अंधारात होते.

हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. रात्री सात ते आठच्या सुमारास शहर व जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे शहरात लावलेले होर्डिंग्ज जमीनदोस्त झाले. तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. या अवकाळी पावसाचा फटका नायगाव, मुखेड, कंधार, लोहा, अर्धापूर, मुदखेड, बारड परिसरासह नांदेड शहरालाही बसला. नायगाव तालुक्यात ‌एका 30 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे

तसेच शहराच्या बोरबन फॅक्टरी भागात एका चारचाकी वाहनावर झाड कोसळले. पाऊस सुरू होताच महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहर पाच तास अंधारात होते. महानगरपालिकेने नाल्याची साफसफाई केली नसल्याने घाण पाणी रस्त्यावर आले. तर सखल भागात लोकांच्या घरांमध्येही पाणी शिरले. नांदेड शहरातील रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची धांदल उडाली. श्रीनगर महावीर चौक या भागात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मार्गातही बदल करावा लागला. यासोबतच शहराच्या देगलूर नाका, इस्लामपुरा, वसंतनगर, खडकपुरा, विष्णूनगर, मगनपुरा आदी सखल भागात नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

जायकवाडी धरणावरील चारीचे पाणी फळबाग-पिकांत घुसल्याने शेतात पाणीच पाणी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अर्धापूर तालुक्यात तसेच बारड परिसरात केळी, पपई यासह बागायती पिकांची मोठी नुकसान झाली. शहरातील नवीन मोंढा भागात व्यापाऱ्यांनी उघड्यावर ठेवलेले हळद व अन्य धान्य झाकण्यासाठी एकच घाई करण्यात आली. तुफान पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. अजूनही रात्री उशिरापर्यंत शहराचा वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. मागील काही दिवसापासून तापमान प्रचंड वाढल्याने या पावसामुळे मात्र नांदेडकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेल्वे स्थानकात आता ऑफिस-कॉलेजचे काम करा, या स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज रेल्वे स्थानकात आता ऑफिस-कॉलेजचे काम करा, या स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज
मुंबई सेंट्रल स्थानकात एअरपोर्टसारखे डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे. या डिजिटल लाऊंजमध्ये अगदी विमानतळासारख्या सोयी आणि सुविधा मिळणार आहेत. भारतीय...
हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते पण, धर्म… संजय राऊत यांच्या पुस्तकातील दावा काय?
उपनगरीय रेल्वे प्रकल्पांना चालना: २०२५-२६ रेल्वे बजेटमध्ये MUTP प्रकल्पांसाठी १७७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर
विराट-अनुष्का व्यतिरिक्त या स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त; कुंजला पोहोचले ‘हे’ सेलिब्रिटी
अनेक महिलांना अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात, आज वयाच्या 58 व्या वर्षी 26 वर्ष लहान तरुणीसोबत करतोय संसार
‘तुला ब्लाउज काढावं लागेल’, बिग बींच्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने माधुरीकडे मागणी करताच…
‘एक नंबर, तुझी कंबर…’ लाल रंगाची साडी, केसात गजरा; जब्याच्या शालूचा जबरदस्त डान्स; वजन वाढल्यामुळे ट्रोल