‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. तुम्ही काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करा, असा संदेश बावनकुळे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतला. चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना थोडी लाज वाटली असती तर असे विधान केले नसते, असे राऊत यांनी म्हटले.
भाजपवर संजय राऊत यांनी कठोर टीका केली. ते म्हणाले, आजचा महाराष्ट्रातील भाजप हा खरा भाजप नाही. त्यांना सत्तेचा माज आली आहे. आजचा भाजप ७० टक्के इतरांचा पक्ष आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील लोक पाहा किंवा विधान परिषदेतून निवडून आलेली आमदार पाहा, हे उपरे आहेत. पक्षातील लोकांना स्थान देण्याऐवजी त्यांना संधी दिली आहे. ज्या लोकांनी संघावर टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. त्या लोकांना सोबत घेऊन भाजप पक्ष वाढवत आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी सांगितले की, भाजपकडे आज सत्ता आहे. पण तेव्हा त्यांची सत्तेची सूज उतरेल तेव्हा त्यांना याबाबत कळेल. चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना थोडी जरी लाज वाटली असती तर असे वक्तव्य केले नसते. तुमचा पक्ष तुमच्या विचारधारेवर वाढवा. तुमची विचारधारा काय आहे. ते पाहा. परंतु भाजपची नाही तर अमित शाह यांची विचारधारा ते आज राबवत आहे. त्यामुळेच इतर पक्ष फोडण्याचा विचार ते करतात. आता ते शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी फोडणार आहे, असे राऊत यांनी म्हटले.
शीख दंगलीबाबत राहुल माफी मागितली. त्यापासून नरेंद्र मोदी यांनी शिकायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले. कुटुंबाची नाती वेगळी असतात आणि राजकीय संबंध वेगळे असतात, असे राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासंदर्भात बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला एकनाथ शिंदे गेले नाहीत. त्यांच्याच सरकारच्या कार्यक्रमाला ते गेले नाहीत. त्याचा अर्थ त्यांनी स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही. ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही. जे भावी मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यापासून आता सावध राहायला पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List