अॅपलने हिंदुस्थानातील प्लॅन तूर्तास थांबवला, ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर कंपनीची माघार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीला हिंदुस्थानात प्रोडक्ट्स बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीने आता आपला पुढील प्लॅन थांबवला आहे. अमेरिकेच्या बाजारात हिंदुस्थानात बनवलेल्या आयफोनची विक्री करण्याचा अॅपल कंपनीचा प्लॅन होता, परंतु ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अॅपल कंपनीने हा प्लॅन तूर्तास थांबवला आहे. अमेरिका सरकारने टॅरिफवरून अचानक अनेक निर्णय बदलले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमके कोणते निर्णय लागू होतात याकडे अॅपलने लक्ष देण्याचे ठरवले आहे. अमेरिकेला आयफोन सप्लाय करण्यासाठी हिंदुस्थानात आयफोनचे उत्पादन केले जाणार होते, परंतु ती योजना आता कंपनीने थांबवली आहे. कंपनीने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे, असे एका सूत्राने सांगितले आहे.
कतार दौऱ्यावर गेलेल्या ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांना सांगितले की, अमेरिकेतील बाजारात विक्री केले जाणारे आयफोन हे हिंदुस्थानात आयात करू नका. त्याचे उत्पादन अमेरिकेतच करा, असे म्हटले होते. पुढील चार वर्षांत अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा अमेरिकन सरकारने विश्वास दाखवला आहे. अमेरिकेतील ह्युस्टन येथे एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट बनवण्यात येणार आहे, असेही म्हटले आहे. या ठिकाणी सर्व्हर बनवले जातील. 2029 पर्यंत अमेरिकेत 20 हजार नव्या नोकऱ्या निर्माण होतील, असेही म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवरून आपली भूमिका वारंवार बदलली आहे. त्यामुळे कूक हे सध्या नाराज आहेत. हिंदुस्थान आयपोन पुरवठा करणारा मुख्य केंद्र देश असेल, असे कूक यांनी म्हटले होते, परंतु त्याच्या अवघ्या काही दिवसांत ट्रम्प यांनी कूक यांना सल्ला देत आयफोनचे उत्पादन हिंदुस्थानात बनवू नका, असे सांगितले आहे. अॅपलने सध्या विश्वास दाखवला आहे की, फोक्सवेगन आणि टाटा ग्रुपसारख्या मॅन्युफॅक्चरिंग पार्टनरद्वारे हिंदुस्थानात गुंतवणूक सुरू ठेवली जाईल. केवळ अमेरिकेत आयफोन सप्लाय करण्याच्या योजनेवर पुन्हा विचार केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List