वाह! अरिजीत सिंगने सुरु केलं बजेट-फ्रेंडली रेस्टॉरंट; फक्त 40 रुपयांत पोटभर जेवण; पाहा फोटो

वाह! अरिजीत सिंगने सुरु केलं बजेट-फ्रेंडली रेस्टॉरंट; फक्त 40 रुपयांत पोटभर जेवण; पाहा फोटो

लोकप्रिय गायक अरिजीत सिंग हा करोडो लोकांच्या मनावर राज्य करतो. त्याचा आवाज त्याच्या चाहत्यांच्या हृदयाला स्पर्श करतो. आपल्या गाण्यांनी जगभरातील लोकांची मने जिंकल्यानंतर, अरिजीत सिंग त्याच्या उदारतेने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. आता त्याच्या चाहत्यांना आणखी एक भेटवस्तू दिली आहे. त्याने जे केलं आहे ते पाहून चाहच्यांच्या मानातील त्याचा आदर आणि प्रेम अजून वाढलं आहे.

अरिजीतच्या रेस्टॉरंटची सर्वत्र चर्चा 

अरिजीतने एक रेस्टॉरंट उघडले आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त 40 रुपयांत जेवण मिळतं. अरिजीत सिंगने सामान्य लोकांसाठी ‘हेशेल’ नावाचे रेस्टॉरंट उघडले आहे. पश्चिम बंगालमधील अरिजीतच्या मूळ गावी मुर्शिदाबाद येथील जियागंज येथे त्याने हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये फक्त 40 रुपयांत एक व्यक्ती पोटभर जेवू शकतो असं म्हटले जातं.

40 रुपयांत जेवण मिळत असल्याची माहिती

हे रेस्टॉरंट नवीन पद्धतीचे नाही. हे अरिजित सिंगचे जुने रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट त्यांचे वडील गुरुदयाल सिंग हे रेस्टॉरंट सांभाळतात. सामान्य लोकांना कमी किमतीत स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न खाता यावा, पोटभर जेवण मिळावं हाच त्या मागचा हेतू आहे. बहुतेक सेलिब्रिटी हाय-फाय रेस्टॉरंट्स उघडतात, परंतु अरिजीतच्या या उपक्रमाने सर्वांचे मन जिंकले आहे.

arijit sing

अरिजीत सिंगचे होत आहे सर्वत्र कौतुक

अरिजीत सिंगसारख्या करोडपतीसाठी धर्मादाय रेस्टॉरंट चालवणे ही मोठी गोष्ट नाही पण चाहत्यांना अजूनही प्रश्न पडत आहे की ही बातमी खरोखर खरी आहे का? एका रिपोर्टनुसार त्याचे हे रेस्टॉरंट सामान्य लोकांना परवडणारे आहे हे खरे असले तरी, जेवणाच्या किमतीबद्दल अंदाज लावले जात असले तरी जेवणाची किंमत स्पष्ट नाही. रेस्टॉरंटमध्ये 40 रुपयांना जेवण मिळत असल्याच्या व्हायरल बातमीला कोणताही ठोस दुजोरा मिळालेला नाही. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की महागाईमुळे एकेकाळी विद्यार्थ्यांसाठी 40 रुपयांना जेवण दिले जात होतं असही म्हटलं जात आहे.पण तरीही आजच्या काळात 40 रुपयांना जेवण देणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले… भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले,...
गोविंदाचे घर आतून एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही, बार सेक्शन ते बेडरूम फारच सुंदर इंटेरिअर, प्रत्येक कोपरा वास्तुनुसार बांधलेला
heart attack: महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय? जाणून घ्या तज्ञांचे मत…
मोदी समर्थकांनी विक्रम मिसरी यांना केलं ट्रोल, कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी
पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचाच आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
पाकिस्तान स्वतः लढत नाही, तो दहशतवाद्यांना पुढे करतो – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला – हर्षवर्धन सपकाळ