जावेद अख्तर यांनी शत्रुघ्न सिन्हाला घरी ठेवण्यास दिला होता नकार, नेमकं काय झालं? वाचा

जावेद अख्तर यांनी शत्रुघ्न सिन्हाला घरी ठेवण्यास दिला होता नकार, नेमकं काय झालं? वाचा

बॉलिवूडमध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी मुंबईत येऊन काम मिळवण्यासाठी आणि स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी खूप संघर्ष केला. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे त्यापैकी एक आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला आहे. आता ते नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया…

जावेद अख्तर यांचा मुंबईतील संघर्ष

जावेद अख्तर १९६० च्या दशकात मुंबईत परतले आणि इंडस्ट्रीत आपली जागा निर्माण करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज जावेद अख्तर बॉलिवूडमधील दिग्गजांपैकी एक मानले जातात. ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’मधील ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’, ‘ओम शांति ओम’मधील ‘मैं अगर कहूं’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील ‘दिल धड़कने दो’, ‘वेक अप सिड’मधील ‘इकतारा’, ‘कभी अलविदा ना कहना’मधील ‘तुम ही देखो ना’ ही जावेद यांच्या काही उल्लेखनीय कामांपैकी आहेत.
वाचा: बाथटबमध्ये उतरली २५ वर्षीय अभिनेत्री, बिना कपडे हिरोसोबत दिसली; इंटरनेटवर खळबळ

भाड्याच्या खोलीत राहायचे जावेद अख्तर

पण तुम्हाला माहिती आहे का, जावेद अख्तर एकेकाळी एका छोट्याशा खोलीत राहायचे, ज्याचे भाडे फक्त १२० रुपये होते? या खोलीत ते दुसऱ्या एका व्यक्तीसोबत राहायचे. मिड-डे या वृत्तानुसार नुकत्याच एका मुलाखतीत, जावेद यांनी त्या काळाची आठवण सांगितली जेव्हा ते एका व्यक्तीसोबत खोली शेअर करायचे. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आपल्या भाड्याच्या खोलीत राहण्यास नकार दिला होता.

खोलीचे भाडे किती होते?

इतर सेलिब्रिटींप्रमाणेच जावेद यांनाही इंडस्ट्रीत संघर्ष करावा लागला. छोटी-मोठी कामे करण्यापासून ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यापर्यंत, या दिग्गज गीतकाराने १९७० मध्ये सिप्पी फिल्म्समध्ये लेखक म्हणून नोकरी मिळवली. या नोकरीतून त्यांना महिन्याला फक्त १७५ रुपये मिळायचे. एक काळ असा होता की, जावेद एका छोट्या खोलीत दुसऱ्या व्यक्तीसोबत राहायचे, ज्याचे एकूण भाडे १२० रुपये होते. मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत जावेद यांनी सांगितले की, शत्रुघ्न सिन्हा यांनी एकदा त्यांच्याकडे खोलीत राहायला घेण्याची विनंती केली होती. जावेद यांनी मजेत त्यांचा प्रस्ताव नाकारला आणि सांगितले की, ते ६० रुपये भाडे देऊ शकणार नाहीत.

शत्रुघ्न सिन्हा यांना दिला होता नकार

जावेद म्हणाले, “मला एक खोली मिळाली होती… जेव्हा मी थोडा स्थिरस्थावर झालो, तेव्हा तिचे भाडे १२० रुपये महिना होते… ६० रुपये मी द्यायचो आणि ६० रुपये दुसरा कोणीतरी. तेव्हा शत्रु (शत्रुघ्न सिन्हा) माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तू मला तुझ्या खोलीत ठेव.’ मी म्हणालो, ‘वेडा आहेस का? तू मलाही बाहेर काढशील. ६० रुपये महिना तू कुठून आणणार? दरमहा ६० रुपये तुला देता येतील का?'”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल