कश्मीर संदर्भात अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा, संसदेचा, सार्वभौमत्वाचा अपमान; संजय राऊत यांची टीका

कश्मीर संदर्भात अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा, संसदेचा, सार्वभौमत्वाचा अपमान; संजय राऊत यांची टीका

भाजप ही नकली चाणक्य असे नकली चाणक्य राजकारणात खुप फिरतात, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच कश्मीर संदर्भात अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा, संसदेचा, सार्वभौमत्वाचा अपमान अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही. लष्कर एखादी कारवाई करत असेल तर ती लष्कराला दिलेली जबाबदारी आहे किंवा अधिकार आहे. याक्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे की पाकिस्तानमध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान, त्यांचे लष्कर प्रमुख यांची वक्तव्य आपण ऐका त्यांच्या विजय मिरवणुका निघतायत. हे पाहून फार वाईट वाटतंय, डोळ्यात पाणी येतंय.
पाकिस्तान युद्ध जिंकलाय असं बोलण्याची हिंमत कशी होते. आपण पाकिस्तान पुढे झुकलेले नाही आहोत, तर आपण अमेरिके पुढे झुकलेले आहोत. भाजप नकली चाणक्य आहे, राजकारणात असे नकली चाणक्य खुप फिरतात. प्रेसिडेंट ट्रम्प यांना भारताने सरपंच म्हणून नेमलेले नाहीत. त्यांना फौजदारकी करण्याची अधिकार मोदींना कसा काय दिलेला आहे? रोज ट्रम्प भारत काश्मीर आणि पाकिस्तान विषयी आम्हाला सूचना करत आहेत. प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्या आधी भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे. हा द्विराष्ट्र करार शिमला करार आहे आणि त्यात कोणताही तिसरा राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही असे संजय राऊत म्हणाले.

तसेच कश्मीर हा आमचा अंतर्गत विषय कश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही समर्थ आहोत. जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही. किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आम्ही आमच्या गावचे पाटील. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे. हे देशाच्या सार्वभौमतेच दुर्दैव आहे. अमेरिकेत कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत हा सौदा भविष्यात कळेल. अमेरिकेत कुणाला काय मिळणार आहे, विशेषतः लाचखोरीचे जे खटले चालू सुरू आहेत त्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते. या क्षणी कुणाचेही नाव घेणं चुकीच आहे. भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये कश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा हा आमच्या संसदेचा, सार्वभौमत्वाचा सरळ सरळ अपमान आहे. मिस्टर मोदी हे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही, पण या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्यांच्याकडून सूचना येतात. हा संसदेचा अपमान आहे असेही संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी का करू नये? अमित शहा हे देशातल्या अंतर्गत हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत. पहलगामध्ये 26 निरपराध पर्यटकांची हत्या झाली यासाठी देशाचे गृहमंत्री जबाबदार आहेत. आणि या युद्धात ज्या पद्धतीने आम्ही आधी गर्जना केल्या आणि आमचे सैन्य पुढे गेलं त्यांचे पाय खेचण्याच काम जर आता कोणी केला असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्पला जर मध्ये घुसवला असेल त्याला जबाबदार आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल. तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत तुम्ही लाहोर कराचीवरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती. आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाचे मोर्चे निघत आहेत. एक भारतीय म्हणून आम्हाला याचे दुःख होणारच असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

दोन्ही देशांकडून युद्ध विरामाची घोषणा होण्यापूर्वी आधीच ट्रम्प यांनी ट्विटरवरून घोषणा केली, हाच तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे. या देशाला माहित नाही, या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहित नाही, कदाचित संरक्षण मंत्र्यांनाही माहित नसेल. ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलंय म्हणून. तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीने अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे. पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे, की 24 तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे सारखे आहेत, समान अंतरावरती आहेत आमच्या दोघांशी संबंध चांगले आहेत. त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही असं अमेरिकेने म्हटलं आहे. त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतात हा काय प्रकार आहे? हाच एक फार मोठा पडद्यामागे काय सौदा घडलाय हे या देशाला कळायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

खरोखर ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल तर त्या ऑपरेशन सिंदूरच पहिलं टार्गेट ते सहा दहशतवादी पाहिजे. ज्यांनी आमच्या 26 बहिणींचे कुंकू पुसलं कुंकू पुसलं. महिलांची मत मिळावीत आणि सहानुभूती मिळावी म्हणून तुम्हाला ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली. ते सहा अतिरिक कुठे गायब झाले, ते देशाच्या बाहेर तर गेले नाहीयेत ना? याची जबाबदारी गृहमंत्री अमित शहांची आहे असे संजय राऊत म्हणाले.

भारत पाकिस्तान मध्ये चर्चा होऊ शकते, प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदींमध्ये चर्चा होऊ शकते, प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात तर अजित पवार, शरद पवार देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणं ही आमच्यासाठी फार लहान गोष्ट आहे. शरद पवार असतील देवेंद्र फडणीस अजित पवार असतील यांच्यात ट्राय पार्टी अग्रीमेंट काय बघाव लागेल.
आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहेत. आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट राजकारणातले आमचे सरपंच आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाहीत.

पाकिस्तानला सोबत आपण युद्धाचीच भाषा केली होती. तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल असे आपण म्हणालो होते. आता
एकच टेबलावरती बसले आहोत. आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडीवर आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत. तसच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू आहे. आमचाही संघर्ष सुरू आहे. पण दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद व्यक्तवं केली, त्याची आम्हाला खंत वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो नसतो. आपल्यामुळे जग अडतंय, राष्ट्र अडतंय या भूमिकेतून राजकारण्यांनी बाहेर पडावं.

शरद पवारांची राजकारणाची पद्धत वेगळी आहे आमची पद्धत वेगळी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. फटे लेकीन हटे नाही ही आमची भूमिका आहे. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही आमची भूमिका आहे. पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाहीये. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचे राजकारण आहे. येतील ते आमच्याबरोबर नाहीतर त्यांच्या शिवाय, हा वीर सावरकरांचा मंत्र आहे तो आमचा प्रेरणादायी आहे. आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र कंगाल केला, मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांची कारस्थानं सुरू आहे, त्यांच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे. जे आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ अन्यथा त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हा संघर्ष केला. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत.

बघा आम्ही राजकारणामध्ये, महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, ते राहू. मी म्हणतोय संघर्षाविषयी बोलतोय. संघर्ष करणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिंम्मत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहांमध्ये. करून करून काय करतील ? तुरुंगात टाकतील ना याच्या पलीकडे काय करणार? आम्ही घाबरत नाही.

राज ठाकरे यांनी दोन ओळीच्या वाक्यातून ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर सुरुवात झाली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, पूर्ण वेळ आजही देतो. आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची. दोन दिवसापूर्वी राज ठाकरे देवेंद्रजींना भेटले. त्यांची जी काही जुनी नाती, गोती संबंध आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील की आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा… विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत...
शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस या मुलीच्या कुटुंबीयांना देणार 62 लाख; पण नक्की कारण काय?
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन; चाहत्यांनाही वाटेल कौतुक
हाय कोलेस्ट्रोलची समस्या झटक्यात दूर होईल, पतंजलीचे हे औषध खायला सुरुवात करा; रिसर्चमध्ये दावा
Virat Kohli Retires : एका युगाचा अंत झाला, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या योगदानासाठी BCCI ने मानले आभार
Operation Sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार
नागरिकांनो सावधान! पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा हिंदुस्थानी अधिकारी भासवून करतेय फोन, वाचा सविस्तर माहिती