Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
Krushana And Sakshi Lolge : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दांपत्ये आज नांदेडला परतले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात निष्पाप 26 पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. तर अनेक जण जखमी झाले. तर या हल्ल्यात अनेक पर्यटक थोडक्यात बचावले. नांदेड मधील कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे त्यापैकी एक. त्यांनी जे अनुभव सांगितला तो अंगावर काटा आणणारा आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे हे सहली साठी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेले होते. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते खाली उतरत होते. काही अंतरावरच असलेल्या लोलगे दांपत्य यांनी या घटनेचा थरार सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. लोलगे दांपत्य नांदेडमध्ये आल्यानंतर कुटुंबियांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं.
गोळीबाराच्या आवाजाने काळजास धस्स
कृष्णा लोलगे यांनी या हल्ल्याचा थरार जवळून अनुभवला. पहलगाम येथे ते घटनेवेळी होते. आम्ही एक-दीड तास त्या ठिकाणी फिरलो आणि नंतर घोड्यावर बसून खाली येत होतो. तेव्हा गोळ्यांचा आम्हाला आवाज आला. रूमवर गेल्यानंतर कळाल हा आतंकवादी हल्ला होता त्यानंतर एकदम आम्ही घाबरलो. आर्मीचे जवान, चाँपर वगैरे जात होते. त्यामुळे आम्हाला संशय आला होता. जेव्हा आम्ही तिथे होतो तेव्हा साधारणपणे 3 हजार लोक असतील. आम्हाला आवाज आला होता म्हटलं झाले असेल काही तरी, आम्ही दुर्लक्ष केलं, मात्र जेव्हा कळलं की दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा आम्ही घाबरलो, असे कृष्णा लोलगे म्हणाले.
रुम बाहेर पडायला भीती वाटायची
साक्षी लोलगे यांनी या घटनेबाबत माहिती दिली. तिथला अनुभव भयंकर होता एवढ्या जणांचा प्राण गेला ती चांगली गोष्ट नाही. जसे आज आम्ही आलो तर सगळ्यांच्याच घरचे लोक वाट बघत असतील. जेव्हा मी फिरत होतो तेव्हा काहीही संशयाला नाही आला, आम्ही एकदम रिलॅक्स होतो. तसं झाल्यानंतर काही एन्जॉयमेंट झाली नाही आम्ही सतत घाबरत होतो. बाहेर निघायचा विचार आला की भीती वाटत होती, असे साक्षी लोलगे म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List