Virat Kohli Retire – विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

Virat Kohli Retire – विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

अखेर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने 269  सायनिंग आॅफ असे म्हणून कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. 269 हा विराटच्या कसोटी क्रिकेटमधील कॅपचा नंबर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मला आता 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, असा कधी प्रवास होईल असं वाटलंही नव्हतं. परंतु कसोटी क्रिकेटने माझी परीक्षा घेतली, मला घडवलं आणि आयुष्यभर हे धडे माझ्यासाठी खूप पुरेसे आहेत. खेळातील संयमता आणि लांबलचक दिवस हे कायमच माझ्यासोबत राहतील यात दुमत नाही असे म्हणत कसोटी क्रिकेटला विराट कोहलीने अखेरचा सलाम ठोकला आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

कसोटी क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय माझ्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. परंतु या एकूण कारकिर्दीमध्ये माझ्याकडे जे काही होते ते सर्व मी दिले आहे. शिवाय या कसोटी क्रिकेटने मला अपेक्षेपेक्षा जास्त परतही दिले आहे.

म्हणूनच इथून जात असताना माझ्या मनात केवळ कृतज्ञता आहे. ही कृतज्ञता खेळासाठी तसेच ज्या खेळाडूंसोबत मी मैदान शेअर केले त्यांच्यासाठी आणि माझ्याप्रवासातील प्रत्येकासाठी मी कृतज्ञ आहे.

मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहतो असं म्हणत कसोटी क्रिकेटमधून विराट कोहलीने अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;