धक्कादायक… ठाणे पालिकेचे गावदेवी मार्केटच बेकायदा, इमारतीला ना ओसी, ना फायर एनओसी

धक्कादायक… ठाणे पालिकेचे गावदेवी मार्केटच बेकायदा, इमारतीला ना ओसी, ना फायर एनओसी

एखादे अनधिकृत बांधकाम आढळल्यास लगेच कारवाईचे फतवे काढले जातात, पण ठाणे महापालिकेच्या मालकीचे गावदेवी मार्केटच बेकायदा असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या मार्केटच्या या इमारतीला अद्याप ओसी मिळाली नसून अग्निशमन दलाचीही एनओसी घेण्यात आलेली नाही. गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या मार्केटच्या इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.

2014 मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीत बेसमेंटला पार्किंग, तळमजल्यावर मंडईसह इतर व्यावसायिक गाळे तर वरील मजल्यावर महापालिकेचे नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यालय आहे. याच ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय व इतर कार्यालयेदेखील असल्याने दररोज हजारो लोकांची ये-जा असते, परंतु या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसीच नाही. तसेच फायर एनओसीही नसल्याची कबुली पालिकेने दिली आहे. नियमाप्रमाणे आओसी असल्याशिवाय कोणालाही फायर एनओसी देता येत नाही. वर्षातून दोनदा अग्निशमन विभागाकडून फायर एनओसी घ्यावी लागते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून ती घेतलेली नाही.

अशा कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही व सद्यस्थितीत या इमारतीची अग्निशमन यंत्रणाच योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे दिसून येत आहे. याचा भंडाफोड काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे. तसेच मार्केटच्या सुरक्षेची व अन्य कागदपत्रे पडताळून त्याची चौकशी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशीही मागणी त्यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.

इमारतीमध्ये मंजूर नकाशाव्यतिरिक्त आत येण्याचा मार्ग, बाहेर जाण्याच्या मार्गातील पूर्वेकडील जिन्यावर, उत्तरेकडील रॅम्पवर अनधिकृत बांधकाम केले आहे. येण्या-जाण्याच्या मार्गात अनधिकृत बांधकाम करून काही जणांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे आग लागल्यास मोठी दुर्घटना अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहर विकास विभागाची परवानगी न घेता स्थावर मालमत्ता विभागाने पुनर्वसन स्वरूपात दिलेल्या गाळेधारकांचीदेखील फसवणूक केली आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीची ओसी नाही. मंजूर नकाशाव्यतिरिक्त बांधकाम, फायर ऑडिट नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. आता तरी याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्त कारवाई करणार का? राहुल पिंगळे, काँग्रेस प्रवक्ते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;