हात-पाय चेहऱ्यावरील टॅंनिग दुर करण्यासाठी हळदीचा ‘हा’ उपाय आहे एकदम खास, जाणून घ्या
आपल्या प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात जेवण् बनवताना हळद वापरली जाते. त्यात ही हळद केवळ अन्नाचा रंग योग्य ठेवत नाही तर तुमचे आरोग्य देखील चांगले ठेवते. याशिवाय हळदीमध्ये असलेले घटक त्वचेचा रंग सुधारण्यापासून ते मुरुमे काढून टाकणे, त्वचेची जळजळ कमी करणे इत्यादी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात बहुतेक लोकांना सन टॅन होण्याची समस्या भेडसावते. यामुळे त्वचेचा रंग खूप गडद दिसू लागतो आणि कधीकधी काही ठिकाणी त्वचा काळी आणि काही ठिकाणी हलकी अशी दिसत असते. यासमस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही हळदीचा एक सोपा उपाय वापरून पाहू शकता, जो तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात चांगले परिणाम देईल.
सन टॅन टाळण्यासाठी लोकं सनस्क्रीन लोशन वापरण्यापासून ते कॉटनच्या कापडाने चेहरा झाकण्यापर्यंत अनेक पद्धती अवलंब करतात, परंतु तरीही टॅनिंग होते. अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून, सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. अशातच टॅनिंग झालेली त्वचा पुन्हा चमकदार करण्यासाठी हळदीचा हा प्रभावी उपाय कसा करायाचा ते आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत…
टॅनिंग रिमूव्ह उपाय असा तयार करा
प्रथम एक चमचा हळद घ्या आणि तिचा रंग बदलेपर्यंत ती कोरडी भाजून घ्या. यानंतर एका भांड्यात हळद काढा आणि त्यात अर्धा चमचा कॉफी टाका. यानंतर यामध्ये मध टाकून पेस्ट तयार करा. आता टॅनिंग रिमूव्ह हळदीचा फेसपॅक तयार आहे.
अशा पद्धतीने हळदीचा फेसपॅकचा वापर करा
हळद, कॉफी आणि मधाची तयार केलेली पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. यानंतर, ते किमान 15 मिनिटे तसेच राहू द्या. जेव्हा फेसपॅक जवळजवळ सुकत आलेला आहे असे जाणवल्यास तेव्हा टोमॅटो अर्धा कापून घ्या आणि तो गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर हलक्या हातानी स्क्रब करा. थोडा वेळ मसाज करा. कमीत कमी 5 मिनिटांनी ओल्या स्पंजने चेहरा स्वच्छ करा.
या गोष्टी लक्षात ठेवा
आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. चेहऱ्यासोबतच तुम्ही हात आणि पायांवरून टॅनिंग काढण्यासाठी देखील याचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही टोमॅटोवर थोडासा लिंबाचा रस टाका आणि तो हात आणि पायांवर चोळा. जर मध तुमच्या त्वचेला सूट करत नसेल तर त्याऐवजी आंबट दहीचा वापर करा.
हळदीचा पॅक लावण्याने होतील हे फायदे
तुम्ही जर हळद, कॉफी, मध आणि टोमॅटोचा हा उपाय योग्यरित्या केल्यास टॅनिंग दूर करण्यासोबतच त्वचेचे छिद्रही घट्ट होतील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. यासोबतच रंगही चांगला होईल. यामुळे तुमची त्वचा मऊ होऊन चमकदार होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List