अ‍ॅव्होकॅडो व्यतिरिक्त ‘हे’ 5 सुपरफूड्स जे कोलेजन वाढविण्यास करतील मदत

अ‍ॅव्होकॅडो व्यतिरिक्त ‘हे’ 5 सुपरफूड्स जे कोलेजन वाढविण्यास करतील मदत

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण झाले आहे आणि त्यामुळे यांचा आरोग्यावर परिणाम होतो आणि आपण अनेक आजारांनी वेढले जातो. त्यामुळे या समस्यापासून दूर राहण्यासाठी आपण आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे फळं आणि भाज्या खात असतो. अशातच आजकाल अ‍ॅव्होकॅडोपासून बनवलेल्या गोष्टी खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. पण सर्वांनाच अ‍ॅव्होकॅडो आवडत नाही आणि ते महाग देखील असते. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अ‍ॅव्होकॅडो व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता.

अ‍ॅव्होकॅडो हे असे एक फळ आहे ज्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, ई, बी6 आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. तुम्ही अ‍ॅव्होकॅडो हे फळ टोस्टवर ठेवून किंवा त्यांचे सँडविच बनवून खाऊ शकता. जरी अ‍ॅव्होकॅडो हे पोषक तत्वांचे भांडार असले तरी, काही पदार्थांमध्ये त्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात.

जर तुम्हाला अ‍ॅव्होकॅडो आवडत नसेल, तर आम्ही तुम्हाला काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत जे अ‍ॅव्होकॅडोपेक्षा तुमच्या आरोग्यासाठी अधिक पौष्टिक आणि फायदेशीर असू शकतात. कोलेजन आणि व्हिटॅमिन बी 12 वाढवण्यास मदत करणारे कोणते सुपरफूड्स आहेत ते जाणून घेऊया.

हे 5 सुपरफूड्स अ‍ॅव्होकॅडोपेक्षा जास्त फायदेशीर

लिंबूवर्गीय फळे कोलेजन वाढवतील

100 ग्रॅम अ‍ॅव्होकॅडोमध्ये फक्त 10 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, तर लिंबू, संत्री,मोसंबी, द्राक्षे आणि किवी यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये 53 ग्रॅम व्हिटॅमिन सी असते. लिंबू देखील स्वस्त आहे आणि त्याचे पौष्टिक मूल्य अ‍ॅव्होकॅडोपेक्षा जास्त आहे. म्हणून, तुम्ही तुमच्या आहारात लिंबाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत आणि कोलेजन वाढवण्यास देखील मदत करतात. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि गुळगुळीत दिसते.

हिरव्या पालेभाज्या

100 ग्रॅम अ‍ॅव्होकॅडोमध्ये 160 कॅलरीज असतात. तर हिरव्या पालेभाज्या पालकामध्ये 23 कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या कमी होते. पालक हा अ‍ॅव्होकॅडोपेक्षा स्वस्त आहे आणि त्यात कॅलरीजही कमी आहेत, म्हणून अ‍ॅव्होकॅडोऐवजी तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश केला पाहिजे.

दुग्धजन्य पदार्थ

100 ग्रॅम अ‍ॅव्होकॅडोमध्ये सोडियमचे प्रमाण फक्त 7 ग्रॅम असते, तर दुसरीकडे दूध, दही, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये 44 ग्रॅम सोडियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखते.

टोमॅटो कोलेजन वाढवण्यासाठी प्रभावी 

100 ग्रॅम टोमॅटोमध्ये 18 कॅलरीज असतात तर अ‍ॅव्होकाडोमध्ये 160कॅलरीज असतात. जे कोलेजन वाढवण्यास मदत करते, तुमची त्वचा चमकदार ठेवते आणि तुमचे केस देखील जाड आणि लांब होतात.

चिया बियाणे

100 ग्रॅम अळशीच्या बियांमध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात, तर 100 ग्रॅम अ‍ॅव्होकाडोमध्ये फक्त 2 ग्रॅम प्रथिने असतात. अ‍ॅव्होकाडो इतका महाग आहे की, तुम्ही त्याऐवजी तुमच्या आहारात अळशीच्या बियांचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. जे तुम्हाला अ‍ॅव्होकॅडोपेक्षा जास्त प्रथिने देईल. या गोष्टी खाल्ल्याने केवळ आरोग्यालाच फायदा होत नाही तर त्वचा आणि केसांनाही फायदा होतो

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 5 दिवस धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट IMD Weather update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 5 दिवस धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा...
खऱ्या शाहरूखपेक्षा डुप्लिकेट शाहरूखचा थाट पाहाच; चाहत्यांची तुफान गर्दी,बॉडीगार्डही हैराण
सिद्धार्थ जाधवची करामत भारी, परीक्षेला गेला अन् चित्र काढून आला, तरी 35 मार्क कसे मिळाले?
बारावीत नापास झालेले बॉलिवूड स्टार, पण कमावतात कोट्यवधींची माया
सीता – पार्वती यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसतात गॅमरस, चौथ्या अभिनेत्रीला पाहून व्हाल थक्क
ब्रँडेड की लोकल कूलर? निर्णय घेण्याआधी हे नक्की वाचा!
superfoods for kids: उन्हाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात ‘या’ 5 सुपरफूड्सचा समावेश करा…