एसीतून उठून लगेच उन्हात जाऊ नका; ब्रन हेमरेजचा धोका, 72 तासांत तब्बल 29 रुग्ण आले समोर

एसीतून उठून लगेच उन्हात जाऊ नका; ब्रन हेमरेजचा धोका, 72 तासांत तब्बल 29 रुग्ण आले समोर

प्रचंड उकाडय़ाने हैराण होत असतानाच एखाद्या चील्ड एसी असलेल्या थंडगार खोलीत प्रवेश केल्यास स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. पण एसीतून लगेचच उन्हात जाणे हे स्वर्गसुख यमाच्या दारात नेऊ शकते. कारण एसीतून उठून लगेच ऊन अंगावर घेतल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचे समोर आले आहे. ब्रह्मानंद नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवघ्या 72 तासांत ब्रेन हॅमरेजचे असे तब्बल 29 रुग्ण समोर आले आहेत.

झारखंडच्या  जमशेदपूरमध्ये उष्णतेची लाट असून मोठय़ा संख्येने उष्माघाताचे आणि ब्रेन हॅमरेजचे रुग्ण सापडत आहेत. बीएनएच रुग्णालयात दाखल झालेल्या ब्रेन हॅमरेजच्या 29 पैकी 17 रुग्णांचे वय  50 ते 60 च्या आसपास असून त्या सर्वांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याचे उघड झाले आहे. एसीतून उठून उन्हात गेल्यानंतर 15 मिनिटांनी अनेकांना ब्रेन हॅमरेजचा त्रास जाणवू लागला. यातील 29 पैकी 3 रुग्ण 70 वर्षांचे असून त्यांना एसीची अजिबात सवय नाही. तर 26 रुग्ण 50 ते 60 वयोगटातील आहेत. सध्या प्रचंड उकाडा असून अशा स्थितीत एसीतून उठून लगेचच उन्हात जाऊ नका किंवा उन्हातून लगेच एसीत बसू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ही आहेत लक्षणे

चेहरा, हात किंवा एक पाय सुन्न होतो, त्याला मुंग्या येतात. अशा परिस्थितीत मेंदू काम करत नाही. डोळ्यांनी दिसणेही कमी होते. प्रचंड डोके दुखते, उलटय़ा सुरू होतात, जिवाची घालमेल होते, शरीराचा पुठलाही भाग आखडून जातो त्या भागात वेदना जाणवत नाहीत.

नेमके काय होते?

कडक उन्हात असताना मेंदूच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. अशा परिस्थितीत आपण अचानक एसीत गेलो तर त्या रक्तवाहिन्या आपुंचन पावतात. त्यामुळे चक्कर येणे किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका संभवतो. मेंदूला रक्तप्रवाह कमी प्रमाणात होतो त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊ शकते. उन्हातून आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने आंघोळ करणेही संयुक्तिक नाही, अशी माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. दरम्यान, एसीतून बाहेर गेल्यानंतर तापमान अचानक वाढते, अशावेळी डोळ्यांना प्रचंड त्रास जाणवू शकतो आणि ब्रेन हॅमरेजचाही धोका संभवतो, असे फिजिशियन डॉ. बलराम झा यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी… ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी… ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली...
ओव्हर स्पीड प्रकरणात एसटी चालकांकडून लाखो रुपयांची दंड वसुली! सरकारी वाहन म्हणून शिथीलता देण्याची संघटनेची मागणी
उद्धवजी… तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय… संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?
पाकिस्तान आणि संजय राऊत एकाच माळेचे मणी.. व्हिक्टीम कार्ड खेळतात – मनसे नेत्याची टीका
‘मी वर बोलू का?’ अटके आधी राज्यातील या बड्या नेत्याचा राऊतांना फोन, अजून एक मोठा गौप्यस्फोट, काय झाले पुढे
हानिया आमिरचं असं कृत्य पाहून बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्याच्या चाहत्यांचा संताप अनावर, Video व्हायरल
मूग डाळीपासून बनवा असे चविष्ट पदार्थ, बच्चेकंपनीही चाटून पुसून खातील